शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

आकाशातून असा कसा पडला सॅटेलाईटचा मलबा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2022 07:30 IST

Nagpur News २ एप्रिल रोजी पडलेल्या अंतराळ अवशेषांबाबत जनसामान्यांमध्ये कुतूहल आहे. अंतराळातून सॅटेलाईटचे अवशेष जमिनीवर कसे काय येतात अशी चर्चा नागरिकांत आहे.

ठळक मुद्देनागरिकात आश्चर्य, वैज्ञानिकांसाठी सामान्यस्पेस बाॅल पडण्याच्या घटना नेहमीच्या

निशांत वानखेडे

नागपूर : २ एप्रिलच्या रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागात आकाशातून पडलेल्या प्रकाशमान वस्तूंनी सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्यात टाकले आहे. हे अवशेष म्हणजे सॅटेलाइट वाहून नेणाऱ्या राॅकेट बूस्टरचा मलबा आहे, हे निश्चित मानले जात आहे. मात्र या वस्तू कशा, काेणत्या देशातून आल्या, हे रहस्य उलगडले नसल्याने सामान्य लाेकांसाठी ते गूढ आहे. मात्र सामान्यांचे हे आश्चर्य खगाेल वैज्ञानिकांच्या दृष्टीने सामान्य घटना आहे का?

चंद्रपूरच्या सिंदेवाही, ब्रह्मपुरी, खडसिंगी आणि वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर आदी ठिकाणी आकाशातून पेटत आलेल्या वस्तू पडल्या. एक रिंग, काही स्पेसबाॅल व धातूच्या तारांचे वेस्टन असलेले सिलिंडर हाेते. सुरुवातीला हा प्रकार म्हणजे युद्धजन्य देशातून किंवा चीनमधून झालेला हल्ला वाटल्याने लाेकांच्या मनात भीती हाेती. पुढे हा सॅटेलाइटच्या राॅकेट बूस्टरचा मलबा असल्याचे व ताे न्यूझीलंड किंवा चीनच्या चेंग झेंग ३बी वाई७७ रॉकेटचा असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला. इस्राेच्या वैज्ञानिकांनी शुक्रवारी सिंदेवाहीला दाखल हाेत त्यांचे निरीक्षण केले व बंगळुरूच्या प्रयाेगशाळेत ते साहित्य नेले. त्यांच्याकडूनच आता या मलब्याचे गूढ उलगडेल.

अमेरिका, युराेपमध्ये नेहमीचा प्रकार

मात्र हा प्रकार खगाेल वैज्ञानिकांच्या दृष्टीने एक सामान्य घटना आहे. चंद्रपुरात पडलेले गाेलाकार बाॅल व रिंग हे अंतराळ यानात किंवा सॅटेलाइट नेणाऱ्या यानाचेच पार्ट आहेत. १९७४ साली अमेरिकेचे फ्लाेरिडा, १९७९ ते १९८२ पर्यंत अलाबामा, २००८ साली लुसियाना आदी ठिकाणी आढळले. मागील दाेन दशकात आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, मध्य अमेरिका भागात असे स्पेस बाॅल सापडले आहेत. गेल्यावर्षी २६ मार्च २०२१ राेजी स्पेसएक्स रॉकेटचा मलबा वाॅॅशिंग्टनमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतात पडला हाेता.

स्पेस बाॅल व इतर अवशेषांचा उपयाेग कुठे हाेताे?

हे गाेलाकार बाॅल म्हणजे स्पेस बाॅल आहेत, जे अंतरिक्ष यानाच्या प्रणालीचा भाग आहेत. ते अंतरिक्ष यानामध्ये वापरले जातात. चंद्रपुरात पडलेल्या बाॅलमध्ये काेणते इंधन आहे, हे सध्या गुलदस्त्यात आहे; पण राॅकेट बूस्टरच्या इंजिनला बूस्ट व नियंत्रित करण्यासाठी त्याचा उपयाेग हाेताे. हे बाॅल्स यानातील लिक्विड हायड्राेजनला संग्रहित करण्याचे काम करतात. त्यामुळे यान गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आकाशात जाते. सापडलेल्या स्पेस बाॅल्सच्या वरच्या भागात डबल व्हायसर आहेत. ॲल्युमिनियमचा वापर केल्यावर असे केले जाते. यामध्ये असलेल्या गॅसचा दाब ३००० पीएसआय एवढा असताे. हे गॅस प्रचंड ज्वलनशील असते; पण अभ्यासकांच्या मते यावेळी जमिनीवर पडण्यापूर्वी ती संपली हाेती. वर्धेत सापडलेले तारांचे वेस्टण असलेले सिलिंडर म्हणजे वैज्ञानिक भाषेत ‘कम्पोजिट ओवररॅप्ड प्रेशर व्हेसल’ (सीओपीव्ही) हाेय. त्यास स्ट्रक्चरल फाइबर कम्पोजिटद्वारे गुंडाळले जाते. ही वस्तू द्रव लीक हाेण्यापासून राेखते. सीओपीव्हीच्या दाबाने टँकमधील गॅस संग्रहित केली जाते. हा राॅकेटचा छाेटा भाग मुख्य यानापासून अलग झाल्यानंतर उपग्रहाला पृथ्वीच्या कक्षेच्या समाेर ढकलताे.

मलबा पडणे चिंतेची बाब

पृथ्वीच्या कक्षेत विविध देशांकडून हजाराे सॅटेलाइट साेडले आहेत. त्यातील ३००० सॅटेलाइट मृत आहेत. हा मलबा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात आल्यानंतर जमिनीवर पडताे, जसा चंद्रपूर, वर्धेत पडला आहे. पुढच्या वर्षी काही माेठ्या स्पेस कंपन्या ६० हजारांवर सॅटेलाइट अंतराळात पाठविणार आहेत. मात्र मृत सॅटेलाइटचा मलबा जमिनीवर पडत आहे का, हा संशाेधनाचा विषय आहे आणि ताे अशाप्रकारे जमिनीवर पडणे चिंता वाढविणारी बाब असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कारण यामुळे भविष्यात माेठा धाेका हाेण्याची शक्यता आहे.

टॅग्स :scienceविज्ञान