शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या ठेवी खासगी बँकेत कशा गुंतविल्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 23:01 IST

Nagpur University's deposits get invested in a private bank राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांनी वित्त व लेखा विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे. यासंदर्भात त्यांनी कुलगुरूंकडे तक्रार केली असून, विद्यापीठाच्या शेकडो कोटींच्या ठेवी नियमांचे उल्लंघन करत खासगी बँकेत गुंतविण्यात आल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देमाजी कुलसचिवांचा सवाल : वित्त व लेखा अधिकाऱ्यांची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. पूरण मेश्राम यांनी वित्त व लेखा विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे. यासंदर्भात त्यांनी कुलगुरूंकडे तक्रार केली असून, विद्यापीठाच्या शेकडो कोटींच्या ठेवी नियमांचे उल्लंघन करत खासगी बँकेत गुंतविण्यात आल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात वित्त व लेखा अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचीदेखील मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी आरोपांचे खंडन करत विधीसभेच्या चौकशी समितीने क्लिन चीट दिल्याचा दावा केला आहे.

२०१८ साली ठेवींची गुंतवणूक करण्यासाठी वित्त व लेखा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. यात उपकुलसचिव अर्चना भोयर यादेखील होत्या. १७७ कोटींची रक्कम इतर बँकेत गुंतविण्यासाठी कमीत कमी पाच राष्ट्रीयीकृत बँकेकडून व्याजदराचे कोटेशन मागविणे आवश्यक होते. मात्र वित्त व लेखा विभागाकडून चारच राष्ट्रीयीकृत बँकांकडून कोटेशन मागविले व एका बँकेला डावलून त्याऐवजी यस बँक या खासगी बँकेकडून कोटेशन मागविले. गुंतवणूक धोरणानुसार राष्ट्रीयीकृत बँकेत गुंतवणूक करण्याचे धोरण असतानादेखील समितीने यस बँकेत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. २०१९ साली ठेवीची मुदत संपल्यानंतर परत कुठलीही प्रक्रिया न राबविता १९१ कोटींची रक्कम परस्पर यस बँकेत गुंतविण्यात आली. रिझर्व्ह बँकेने ५ मार्च २०२० रोजी यस बँकेवर कारवाई केल्यानंतर विद्यापीठाच्या ठेवी अडकण्याचे संकट निर्माण झाले होते. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर विद्यापीठाने १८ मार्च २०२० रोजी ही रक्कम मुदतपूर्व रोखीकृत केली. विद्यापीठाला २०७ ऐवजी २०१ कोटी रुपये मिळाले व विद्यापीठाचे ५ कोटी ९० लाख रुपयांचे नुकसान झाले, असा आरोप डॉ. पूरण मेश्राम यांनी केला.

कुठलाही गैरव्यवहार व नुकसान नाही : हिवसे

यासंदर्भात डॉ. राजू हिवसे यांना संपर्क केला असता त्यांनी कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले. नियमांत जे होते त्यानुसारच प्रक्रिया करून विद्यापीठाच्या ठेवी गुंतविण्यात आल्या होत्या. विधीसभेची त्यावर समितीदेखील लागली होती व समितीने सखोल चौकशी केली होती. विद्यापीठाचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचा तसेच नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा अहवाल संबंधित समितीने दिला होता. पाच वर्षांच्या कारकिर्दीत कुठलाही गैरप्रकार झाला नाही. माझ्यावर तसेच विभागावर होत असलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे डॉ. हिवसे यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठInvestmentगुंतवणूक