शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मॉयलने ३१३ एकर जमीन अधिग्रहीत कशी केली? - चंद्रशेखर बावनकुळे

By जितेंद्र ढवळे | Updated: October 10, 2023 17:17 IST

सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली.

नागपूर : सावनेर तालुक्यातील खापा, तिघई व गुमगाव येथील शेतकऱ्यांचे आक्षेप न नोंदविता मॉयलने ३१३ एकर जमीन ५० वर्षांच्या लीजवर घेतली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने हा निर्णय एकतर्फी झाल्यामुळे मॉयल व महसूल प्रशासनाने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे सात-बारे तत्काळ दुरुस्त करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कळमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. कळमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी अनुदान, पीकविम्याचे अनुदान तातडीने देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावर पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

धापेवाडा येथे उड्डाणपुलाचा विस्तार करून नागरिकांना येण्या- जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याच्या मागणीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढावा. सावनेर बायपासवर स्ट्रीट लाइट लावण्यात यावे, कळमेश्वर येथे सुरू असलेल्या अवैध अतिक्रमण व हॉटेलवर कार्यवाही करावी. बसस्थानक ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करावे, भूमीअभिलेख विभागाच्या अडचणी यासह विविध समस्या सोडविण्यात याव्या, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. कळमेश्वर येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले.

महाजनको देणार महादुल्याला पाणीकामठी तालुक्यातील महादुला नगर पंचायत क्षेत्रात मजिप्रच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून मोठ्या प्रमाणात देयके देण्यात आल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले. यावर बावनकुळे यांनी महादुला प्रकल्पबाधित गावात असून नागरी सुविधांसाठी महाजनकोच्या सीएसआरमधून १५ लाख लिटर पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी महाजनको अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसा प्रस्ताव तातडीने नगर पंचायत व मजिप्रने तयार करावा, अशा सूचना केल्या.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे