शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’च्या ३.२५ कोटीचे काय झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 20:33 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला विविध वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मंजूर झालेल्या ३ कोटी २५ लाख रुपयांचे काय केले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शासनाला केली व यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : शासनाला मागितले उत्तर

ऑनलाईन लोकमत नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला विविध वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी मंजूर झालेल्या ३ कोटी २५ लाख रुपयांचे काय केले अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शासनाला केली व यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.यासंदर्भातील जनहित याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या जानेवारीमध्ये शासनाने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे १५७ अकुशल कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंग केली जाईल असे सांगितले होते. परंतु, त्यापैकी केवळ ८० कर्मचारी भरण्यात आले. तसेच, नवीन इमारतीतील शस्त्रक्रिया विभागात एसी लावण्यात आलेले नाहीत, ही बाब याप्रकरणातील न्यायालय मित्र अ‍ॅड. अनुप गिल्डा यांनी सुनावणीदरम्यान निदर्शनास आणून दिली असता न्यायालयाने शासनाला यावरही दोन आठवड्यांत स्पष्टीकरण मागितले.अधिष्ठाता नियुक्तीसाठी बैठकमेयोमध्ये नियमित अधिष्ठाता नियुक्तीसाठी ११ जानेवारी रोजी बैठक होणार असल्याची माहिती शासनाने न्यायालयाला दिली. सध्या डॉ. अनुराधा श्रीखंडे या प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २७ एप्रिल रोजी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिवांनी जूनपर्यंत नियमित अधिष्ठात्याची नियुक्ती करण्याची ग्वाही दिली होती. परंतु, मेयोला अद्याप नियमित अधिष्ठाता मिळालेला नाही.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHigh Courtउच्च न्यायालय