मूलभूत सुविधांपासून वंचित : नागरिक त्रस्तविहंग सालगट - नागपूर सुमारे २० हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या बुटीबोरीत केवळ एक महिला शौचालय असून, त्यालाही गत दीड वर्षांपासून कुलूप लागले आहे. ही या गावाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. शौचालयातील नळ व वॉश बेसिन चोरीला जातात, शिवाय येथे पाण्याची व्यवस्था नसल्याने ग्राम पंचायतीने कुलूप लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. बुटीबोरी गत अनेक वर्षांपासून अशा विविध मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. यामुळे या परिसराचा लूक कसा बदलेल , असा सवाल केला जात आहे. येथील ग्रामपंचायतीमध्ये एकूण सहा वॉर्ड आहेत. परंतु येथे चालण्यासाठी रस्ते सुद्धा नाहीत. त्यामुळे ग्राम पंचायत कार्यालयापर्यंत चार चाकी वाहन पोहोचू शकत नाही. याशिवाय जिकडे-तिकडे अस्वच्छता आणि ड्रेनेजचे पाणी पसरलेले दिसून येते. अनेक खाली प्लॉटमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी साठलेले आहे. त्यामुळे सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच काही दिवसांपूर्वी डेंग्यूमुळे येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दुसरा मेयो रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.
कसा बदलणार लूक ?
By admin | Updated: October 10, 2014 01:01 IST