शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवाच आजारी, रुग्ण कसे बरे होणार ?

By admin | Updated: April 26, 2017 01:25 IST

शहरात मेयो व मेडिकल यासारखे मोठे हॉस्पिटल्स आहेत. परंतु येथे नागपूरसह विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगड अशा भागातील रुग्ण उपचारासाठी येतात.

सदर रोगनिदान केंद्राची व्यथा : व्यवस्थेवर उपचाराची गरज गणेश हुड/आनंद डेकाटे  नागपूर शहरात मेयो व मेडिकल यासारखे मोठे हॉस्पिटल्स आहेत. परंतु येथे नागपूरसह विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगड अशा भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात रुग्णांची कायम गर्दी असते. महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाचे उपचार मिळाले तर या रुग्णालयावरील बराचसा भार कमी होऊ शकतो. परंतु महापालिकेची आरोग्य सेवा अपंग ( आजारी) झाल्याने येथे रुग्णांचा आजार बरा होण्याची शाश्वती राहिलेली नाही. महापालिकेच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयापाठोपाठ सदर येथील रोगनिदान व अनुसंधान केंद्रातील व्यवस्था कोलमडली आहे. शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नाागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिके ची आहे. त्यानुसार महापालिका रुग्णालयात उत्तम उपचार मिळत असल्याचा दावा पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा आहे. पण सदर रोगनिदान कें द्राला प्रस्तुत प्रतिनिधींनी भेट दिली असता, येथे अत्याधुनिक आरोग्य सेवाच आजारी, रुग्ण कसे बरे होणार ? यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा अभाव असल्याने यंत्रणा कोलडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा दावा सपशेल खोटा आहे. उत्तर व दक्षिण-पश्चिम नागपुरात शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे दररोज या भागातील १०० ते १५० गरीब व गरजू रुग्ण सदर रोगनिदान केंद्रात उपचारासाठी येतात, परंतु पदरी निराशाच येते. रुग्णालयाची इमारत मोडकळीस आली आहे. रुग्णांना बसण्यासाठी चांगली सुविधा नाही. ओपीडीचा परिसर व्यवस्थित स्वच्छ केला जात नाही. ही इमारत हेरिटज असल्याने बांधकाम करता येत नाही, असे सांगण्यात आले. परंतु मोडकळीस आलेल्या भागाची डागडुजी व अंतर्गत दुरुस्तीची गरज आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिके कडे पाठविण्यात आला आहे. परंतु याकडे प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. इमारत मोडकळीस रु ग्णालयाची जुनी इमारत हेरिटेज असल्याचे कारण सांगून डागडुजी व दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे ही इमारत मोडकळीस आली आहे. दर्शनी भागाच्या छतावर पालापाचोळ्याचा ढीग साचला आहे. वारा आला की हा कचरा खाली येतो. इमारतीच्या समोरील झाडाच्या बुंध्याचा ओटा तुटला आहे. यामुळे दगड व माती विखुरलेली आहे. इमारत मोडकळीस आली असून दुरुस्तीची गरज आहे. औषधांचा तुटवडा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडे चौकशी केली असता रुग्णांना काही गोळ्या मोफत दिल्या जातात तर काही औषधं बाजारातून खरेदी करण्यास सांगितले जाते, अशी माहिती मिळाली. मात्र यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता औषधांचा तुटवडा नसल्याचे सांगण्यात आले. पॅथालॉजी नाही अनेकदा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची रक्त, लघवी, थुंकी व अन्य प्रकारची तपासणी करणे गरजेचे असते. त्याशिवाय औषध देता येत नाही. परंतु पॅथालॉजीची व्यवस्था नसल्याने गरीब व गरजूंना खासगी पॅथालॉजीत तपासणी करावी लागते. यामुळे अनेकदा गरीब रुग्ण उपचार घेण्याचे टाळतात. यातून आजार बळावण्याचा धोका असतो. एक्स-रे मशीनची सुविधा नाही रुग्णांवर उपचार करताना अनेकदा एक्स-रे काढावा लागतो. परंतु सदर रोगनिदान केंद्रात ही व्यवस्था नाही. यामुळे खासगी रुग्णालयात एक्स-रे काढावा लागतो. यामुळे वेळेवर उपचार मिळत नाही, अशी माहिती रुग्णांनी दिली. यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा अभाव असल्याने यंत्रणा कोलडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा दावा सपशेल खोटा आहे.उत्तर व दक्षिण-पश्चिम नागपुरात शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे दररोज या भागातील १०० ते १५० गरीब व गरजू रुग्ण सदर रोगनिदान केंद्रात उपचारासाठी येतात, परंतु पदरी निराशाच येते. रुग्णालयाची इमारत मोडकळीस आली आहे. रुग्णांना बसण्यासाठी चांगली सुविधा नाही. ओपीडीचा परिसर व्यवस्थित स्वच्छ केला जात नाही. ही इमारत हेरिटज असल्याने बांधकाम करता येत नाही, असे सांगण्यात आले. परंतु मोडकळीस आलेल्या भागाची डागडुजी व अंतर्गत दुरुस्तीची गरज आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिके कडे पाठविण्यात आला आहे. परंतु याकडे प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली आहे. इमारत मोडकळीस रु ग्णालयाची जुनी इमारत हेरिटेज असल्याचे कारण सांगून डागडुजी व दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे ही इमारत मोडकळीस आली आहे. दर्शनी भागाच्या छतावर पालापाचोळ्याचा ढीग साचला आहे. वारा आला की हा कचरा खाली येतो. इमारत मोडकळीस आली असून दुरुस्तीची गरज आहे. औषधांचा तुटवडा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडे चौकशी केली असता रुग्णांना काही गोळ्या मोफत दिल्या जातात तर काही औषधं बाजारातून खरेदी करण्यास सांगितले जाते, अशी माहिती मिळाली. मात्र यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता औषधांचा तुटवडा नसल्याचे सांगण्यात आले.