शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

घर बांधायचे कसे

By admin | Updated: May 9, 2014 02:00 IST

स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. हौसेला मोल नसते, अशी म्हण असली तरी प्रत्येक व्यक्ती आपल्या ऐपतीप्रमाणे घर बांधत असतो.

 

महागाईची झळ : खिशाला कात्री -

मजुरीही वाढली

 
 

मोरेश्‍वर मानापुरे■ नागपूर स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. हौसेला मोल नसते, अशी म्हण असली तरी प्रत्येक व्यक्ती आपल्या ऐपतीप्रमाणे घर बांधत असतो. मात्न, आजच्या वाढत्या महागाईच्या काळात सामान्यांचे तर घर बांधण्याचे स्वप्न हे आता स्वप्नच होऊन बसले आहे. लोखंड ४५ हजार रु. टन मागणीनुसार लोखंडाच्या किमतीत कमी जास्त होतात. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा किमती दीडपटीने वाढल्या आहेत. ३0 रुपये किलोच्या तुलनेत किंमत ४५ रुपये आहे. डायमीटरनुसार किमती २-३ रुपयेकमीजास्त असते. सध्या लोखंडाला मागणी कमी आहे. गिट्टी ६ हजार रु. ट्रक क्युबिक फूटमध्ये मिळणार्‍या गिट्टीचे दर अल्पसे वाढले आहेत. गेल्यावर्षीच्या ५५00 रुपये ट्रकच्या तुलनेत यंदा दर ६ हजारावर (२४ रु. क्युबिक फूट) गेले आहेत. सुरू असलेले बांधकाम आणि मागणीनुसार विक्रेते गिट्टीचे दर ठरवितात. सिमेंट २७ हजारात १00 बोरी सिमेंटकंपन्या एकमेकांशी हातमिळवणी करून दर वाढवितात. मागणी वाढताच दर आठवड्याला प्रति बोरी ५ रुपये वाढविण्याचे धोरण असते. सध्या ठोक दर २७0 रुपये (किरकोळ ३00 रु.) असून गेल्यावर्षी २३0 रुपयांच्या आसपास होते. विटा हजार ६५00 रु. विटांचा प्रति वीट हिशोब पाहिल्यास यंदा दर साडेसहा रुपयांवर गेले आहे. गेल्यावर्षी साडेचार रुपये होता. मध्यंतरी पावसामुळे मातीच्या कच्चा विटा खराब झाल्या, शिवाय कामगारांची रोजी वाढली. सध्या फ्लाय अँशच्या पांढर्‍या विटा विक्रीस आहेत. रेती ६,८00 रु. ट्रक गेल्यावर्षीच्या तुलनेत रेतीचे दर दीडपट झाले आहेत. गेल्यावर्षी ४ हजार रुपये ट्रक (१६ रु. क्युबिक फूट) दर या वर्षी ६ हजार ८00 रुपयांवर (२६ रु. क्युबिक फूट)गेले आहेत. वर्षभरात एवढी दरवाढ हे एक कोडंच आहे. आकारानुसार ट्रकचे दर आहेत.

बांधकामात कुशल कामगार महत्त्वपूर्णअसतात. त्यांची मजुरीही दीडपटीने वाढली आहे. सध्या कुली २५0 रुपये तर महिला २00 रुपये रोजी घेतात. शिवाय मिस्त्री ४00 ते ५00 रुपयांपर्यंत मागतात. स्वस्त धान्य योजनेने मजूर कामावर येत नाहीत. बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण असतानाही घरांच्या किमती आकाशाला भिडल्याची लोकांची ओरड सत्य आहे. जमिनीच्या किमती आणि घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य आणि सजावटीच्या वस्तू महागल्या आहेत. रेती, गिट्टी, लोखंड, सिमेंट, विटा आणि मजुरीही दीडते दोन पटीने वाढली आहे. बिल्डर्सला घर बांधण्याचा अनुभव असल्याने परिस्थिती पाहून तो कच्च्या साहित्याची खरेदी करतो आणि बिल्डिंग उभी करतो. हे ज्ञान स्वतंत्रघर बांधणार्‍यांना नसल्याने त्याला बर्‍याच अडचणी येतात. घर बांधताना ठेकेदाराची मर्जीचालत नाही. मजूरच सर्वकाही असतो. त्यामुळे अनेकांना वेळेत घर बांधणे कठीण असते. कच्च्या साहित्याचे वाढलेले दर आणि विविध अडचणींवर मात करताना घर बांधायचे कसे, असा सवाल आहे.