शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

‘दत्तक’गावात हरले तरी भाजपाचा विजय कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:07 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला.

ठळक मुद्देवडेट्टीवार यांचा भाजपाला सवाल : दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ पाच टक्के शेतकºयांनाही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भाजपा समर्थित सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला. ज्यांना आपले गाव राखता आले नाही ते जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा कसा काय करू शकतात, असा सवाल करीत विदर्भात काँग्रेसच आघाडीवर असून भाजपाने आधी गावनिहाय जिंकलेल्या सरपंचाची यादी जाहीर करावी, असे आव्हान काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिले.वडेट्टीवार म्हणाले, नांदेड, गुरुदासपूर, केरळ व आताच्या ग्रामपंचायत निकालाने भाजपाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विदर्भातील एकाही जिल्ह्यात भाजपा काँग्रेसच्या समोर नाही. राज्याचा विचार करता काँग्रेसला ९८२, राष्ट्रवादी काँग्रेसला ४०० तर भाजपाला ६२७ ग्रामपंचायतीत विजय मिळाला आहे. शिवसेनेला १५१ व अपक्ष गटांनी २८९ ठिकाणी बाजी मारली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात खा. नाना पटोले यांचा प्रभाव पडला नाही, हे दाखविण्यासाठी भाजपाने तेथील निकालाची खोटी आकडेवारी दिली. आता मतदानासाठी व्हीव्हीपॅट लागत आहेत. त्यानंतर यांची परीक्षा मशीनची होती की मतांची हे स्पष्ट होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र आॅनलाईन अंमलबजावणीत शेतकºयांची फसवणूक केली. त्यामुळे शेतकरी उलटला व असे निकाल आले. आता कर्जमाफीचे अपयश झाकण्यासाठी दिवाळीपूर्वी १० लाख शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.प्रत्यक्षात ५ टक्केही शेतकºयांना दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळालेली नाही. काही जिल्ह्यांमध्ये फक्त प्रातिनिधिक स्वरूपात शेतकºयांना चेक देण्यात आले आहेत. याशिवाय कर्जमाफीचे पैसे शेतकºयांच्या खात्यात जमा होताच ते बँकेतील कर्जाच्या खात्यात वळते होणार आहेत. बँकांनी तसे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामुळे या कर्जमाफीचा थेट फायदा शेतकºयांना होणार नाही, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.जीएसटीमुळे व्यापारी खरेदीसाठी बाजार समित्यांकडे फिरकलेले नाहीत, घरूनच माल खरेदी करीत आहेत. सोयाबीनला फक्त दोन हजार रुपये भाव दिला जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली असल्याचा आरोप त्यांनी केला.प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, आदिवासी विकास विभागासाठी बजेटमध्ये एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यातून ५०० कोटी रुपये कर्जमाफीसाठी वळविण्यात आले आहेत. सुरुवातीला ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असल्याचे सांगितले जात होते. आता हा आकडा १० लाख शेतकºयांपर्यंत खाली आला आहे. आकडेवारी सारखी बदलली जात असल्यावर लोंढे यांनी आक्षेप घेतला.