शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नाग नदीलगतची घरे व दुकाने हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:13 IST

महापालिकेने नागपूर शहराच्या गौरवशाली इतिहाची साक्ष असलेल्या नाग नदीचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी केली आहे. यासाठी नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या १५ मीटर क्षेत्रातील घरे, दुकाने व प्रतिष्ठान हटविण्यात येणार आहे.  महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या क लम ३७ अंतर्गत या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आणला जाणार आहे.

ठळक मुद्देसभागृहात प्रस्ताव : आक्षेप व सूचना मागविल्या : नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या १५ मीटर क्षेत्रात सौंदर्यीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने नागपूर शहराच्या गौरवशाली इतिहाची साक्ष असलेल्या नाग नदीचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी केली आहे. यासाठी नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या १५ मीटर क्षेत्रातील घरे, दुकाने व प्रतिष्ठान हटविण्यात येणार आहे.  महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या क लम ३७ अंतर्गत या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत आणला जाणार आहे.नागपूर शहराच्या मंजूर विकास प्रारूपानुसार मौजा अंबाझरी ते पुनापूर संगमापर्यंत पश्चिम ते पूर्व नागपुरातून नाग नदी वाहते. शहरातील नाग नदीची लांबी १६.७३२ किलोमीटर आहे. ही नदी नागपूर शहरातील मौजा अंबाझरी, लेंड्रा, धंतोली, जाटतरोडी, हिवरी, वाठोडा, पारडी, भरतवाडा, पुनापूर भागातून वाहते. सद्यस्थितीत नदीच्या पात्रालगत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या, बहुमजली इमारती, दुकाने व धार्मिक स्थळे उभारण्यात आलेली आहेत.काही ठिकाणी नदीपात्राची रुंदी १२ ते ४० मीटरपर्यंत आहे. रिव्हर फ्रं ट डेव्हलमेंट प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होताच नदीकाठावरील शेकडो मालमत्ता पाडण्यात येतील. यात काही धार्मिक स्थळांचाही समावेश राहणार आहे. नदी किनाऱ्यावरील जागेवर आरक्षण असल्यास आरक्षण सौंदर्यीकरणासाठी बदलले जाणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नुकतीच नवी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली. यात नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. डिसेंबर २०१८ पर्यंत प्रकल्प आराखडा तयार करून फे ब्रुवारी २०१९ मध्ये कामाला सुरुवात करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले.मनपा अंबाझरी उद्यानाची जागा परत घेणारअंबाझरी तलावालगतची ४२.४२ एकर (१,७१,६६२.६९ चौरस मीटर) जमीन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला देण्याचा निर्णय आॅक्टोबर २०१५ मध्ये घेण्यात आला होता. ३० जानेवारी २०१८ ला या जमिनीचा ताबा महामंडळाला देण्यात आला. परंतु अद्याप या जागेवर कोणत्याही स्वरूपाचे विकासात्मक काम सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे ही जमीन परत घेण्याची तयारी महापालिकेने केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ही जमीन महामंडळाकडून परत घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाणार आहे.

टॅग्स :Naag Riverनाग नदीEnchroachmentअतिक्रमण