लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरील क्रिष्णम रेस्टॉरंटमध्ये उपवासासाठी मागविलेल्या फराळात माशी आढळल्याचा आरोप संत तुकडोजी नगर, सुभाषनगर येथील रहिवासी निशांत जयस्वाल यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे याप्रकरणाची तक्रारसुद्धा केली आहे.निशांत जयस्वाल यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनुसार ते शुक्रवारी सकाळी १०.१५च्या सुमारास रेस्टॉरेंटमध्ये गेले होते. त्यांनी साबुदाणा उसळची ऑर्डर केली. उसळीसोबत त्यांना दही मिळाले. उसळ खात असताना त्यांना दह्यामध्ये मेलेली माशी आढळून आली. ही बाब त्यांनी वेटर तसेच हॉटेलच्या संचालकांच्याही लक्षात आणून दिली. परंतु त्यांची तक्रार कुणीच ऐकून घेतली नाही. त्यांची तक्रार ऐकून न घेता तक्रारकर्ते निशांत यांना तुमच्याकडून काय होते ते करून घ्या, असे उलटसुलट उत्तर दिले. त्यांना उद्धट वागणूक दिली. दरम्यान त्यांनी फराळाचा व बिलाचा फोटो मोबाईलमध्ये घेतला व या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली.यासंदर्भात क्रिष्णम रेस्टॉरेंटचे मॅनेजर राकेश श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, निशांत जयस्वाल या ग्राहकांकडून आम्हाला टार्गेट केले जात आहे. निशांत हे गुरुवारीही रेस्टॉरेंटमध्ये आले होते. त्यांनी काही ऑर्डर केले नंतर ते रद्दही केले. शुक्रवारीही ते रेस्टॉरेंटमध्ये आले. त्यांनी केलेल्या ऑर्डरमध्ये माशी आढळली. त्यांनी लगेच रेस्टॉरेंटमध्ये हल्ला सुरू केला. ग्राहकांना ते ओरडून ओरडून सांगू लागले. ते एकप्रकारे टार्गेट केल्यासारखे वागत होते. आम्ही त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वर्तन नीट नव्हते. आम्ही त्यांच्याकडून बिल घेतले नाही. राकेश म्हणाले की आमच्या रेस्टॉरेंटमध्ये उच्च दर्जाचे पेस्ट कंट्रोल करण्यात आले आहे. ग्राहकांना अन्नपदार्थ देताना तपासून घेतले जातात.
उपवासासाठी मागविलेल्या फराळात आढळली माशी; नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 10:09 IST
वर्धा रोडवरील क्रिष्णम रेस्टॉरंटमध्ये उपवासासाठी मागविलेल्या फराळात माशी आढळल्याचा आरोप संत तुकडोजी नगर, सुभाषनगर येथील रहिवासी निशांत जयस्वाल यांनी केला आहे.
उपवासासाठी मागविलेल्या फराळात आढळली माशी; नागपुरातील घटना
ठळक मुद्देग्राहकाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्राररेस्टॉरंटचे मॅनेजर म्हणतात ग्राहकाकडून टार्गेट केले जात आहे