शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेल होण्यासाठी सोडले घर : नागपूर लोहमार्ग पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:32 IST

टीव्ही आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तो मॉडेलिंगच्या क्षेत्राकडे आकर्षित झाला. मॉडेल बनण्याचे स्वप्न त्याने बघितले अन् त्यासाठी घरून निघाला. मात्र, नागपुरात येताच लोहमार्ग पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली.

ठळक मुद्देनातेवाईकांच्या केले स्वाधीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टीव्ही आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तो मॉडेलिंगच्या क्षेत्राकडे आकर्षित झाला. मॉडेल बनण्याचे स्वप्न त्याने बघितले अन् त्यासाठी घरून निघाला. मात्र, नागपुरात येताच लोहमार्ग पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली.ओडिशा येथील विशाल (बदललेले नाव) हा १५ वर्षाचा बालक ९ व्या वर्गात शिकतो. सतत सोशल मीडिया टीव्हीच्या संपर्कात आल्याने त्याने मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले. १४ जून रोजी तो घरी कुणालाही न सांगता निघाला. कुठलीच माहिती नसल्यामुळे काही दिवस त्याने प्रवासात घालविले. तिकडे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला. प्रवास करत तो गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर आला. प्री-पेड ऑटो बुथजवळ तो उभा होता. अल्पवयीन मुलगा असल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रोशन खांडेकर, उपनिरीक्षक रवी वाघ, हेड कॉन्स्टेबल प्रमोद घ्यारे, प्रल्हाद पत्रे, रोशन मोगरे यांनी त्याची विचारपूस केली. त्यावर मॉडेल होण्यासाठी घरून निघून आल्याचे त्याने सांगितले. त्याला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडून नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर संपर्क साधण्यात आला. त्याची मावशी नागपुरातच राहते. मुबारक शेख यांनी त्याच्या मावशीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याचे नातेवाईक लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. खात्री पटल्यानंतर विशालला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलगा सुखरुप भेटल्यामुळे नातेवाईकांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरPoliceपोलिस