शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘डीबीए’च्या आमसभेत निवडणुकीवरून वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:17 IST

विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक घोषित केली जात नसल्याच्या मुद्यावरून जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) आमसभेत जोरदार वादावादी झाली. निवडणुकीसाठी आग्रही असणाऱ्या सदस्यांनी सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांना घेरून तत्काळ निवडणूक जाहीर करण्याची मागणी केली. अ‍ॅड. तेलगोटे यांनी निवडणूक का लांबली याचे स्पष्टीकरण देण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हते. शेवटी तेलगोटे यांनी येत्या आॅक्टोबरमध्ये निवडणूक घेण्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देकार्यकाळ संपला : आॅक्टोबरमध्ये निवडणूक घेण्याची घोषणा

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक घोषित केली जात नसल्याच्या मुद्यावरून जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) आमसभेत जोरदार वादावादी झाली. निवडणुकीसाठी आग्रही असणाऱ्या सदस्यांनी सचिव अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांना घेरून तत्काळ निवडणूक जाहीर करण्याची मागणी केली. अ‍ॅड. तेलगोटे यांनी निवडणूक का लांबली याचे स्पष्टीकरण देण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हते. शेवटी तेलगोटे यांनी येत्या आॅक्टोबरमध्ये निवडणूक घेण्याचे जाहीर केले. आमसभा शनिवारी दुपारी जिल्हा न्यायालयातील खोलीत पार पडली. विशेष म्हणजे, अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल आमसभेत अनुपस्थित होते.जिल्हा विधिज्ञ संघटनेला सन्मानजनक इतिहास आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये अंतर्गत राजकारण व वैयक्तिक स्वार्थामुळे संघटनेच्या प्रतिष्ठेला सतत गालबोट लागत आहे. यापूर्वीच्या कार्यकारिणीने कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल १८ महिने खुर्च्या सोडल्या नव्हत्या. त्या कार्यकारिणीत अ‍ॅड. सुदीप जयस्वाल अध्यक्ष तर, अ‍ॅड. मनोज साबळे सचिव होते. त्यावेळी संबंधित कार्यकारिणीवर बरीच टीका झाली होती. कोंडी असह्य झाल्यानंतर त्या कार्यकारिणीने निवडणूक जाहीर केली होती. कार्यक्रमानुसार, २३ जानेवारी २०१५ रोजी निवडणूक झाली. अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल तर, सचिवपदी अ‍ॅड. नितीन तेलगोटे विजयी झाले. या कार्यकारिणीचा दोन वर्षांचा कार्यकाळ २२ जानेवारी-२०१७ मध्ये संपला. परंतु, त्यांनी आतापर्यंत निवडणूक जाहीर केली नव्हती. परिणामी, त्यांच्यावरही सदस्यांचा दबाव वाढत चालला होता. आमसभेत त्याचे पडसाद उमटले. माजी अध्यक्ष सुदीप जयस्वाल, माजी सचिव मनोज साबळे व इतरांनी विद्यमान कार्यकारिणीवर प्रचंड रोष व्यक्त केला. कार्यकाळ संपल्यानंतर पदावर राहण्याचा अधिकार संपतो. त्यामुळे ताबडतोब निवडणूक जाहीर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर अ‍ॅड. तेलगोटे यांनी येत्या आॅक्टोबरमध्ये निवडणूक घेण्याचे जाहीर केले. लांबलेल्या निवडणुकीमुळे बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाने ‘डीबीए’ला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.-----------------कार्यक्रम आॅगस्टमध्येसंघटनेची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या आॅगस्टमध्ये समितीची बैठक होईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. विविध विकासकामे, वकिलांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी इत्यादी बाबींमुळे संघटनेची निवडणूक लांबली. जाणीवपूर्वक काहीच करण्यात आले नाही. विद्यमान कार्यकारिणी सदस्यांच्या भावनांचा आदर करते.----- अ‍ॅड. नितीन तेलगोटे, सचिव.

टॅग्स :advocateवकिलnagpurनागपूर