शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महापौर बदलण्याची हॉट चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 11:03 IST

नागपुरातील तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना आता राजकीय पारा चढण्याचेही संकेत आहेत. महापालिकेच्या वर्तुळात महापौर बदलाच्या ‘हॉट’ चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देउपमहापौरही बदलण्याचे संकेतजूनमध्ये घोषणा होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना आता राजकीय पारा चढण्याचेही संकेत आहेत. महापालिकेच्या वर्तुळात महापौर बदलाच्या ‘हॉट’ चर्चेला उधाण आले आहे. सध्या नंदा जिचकार या महापौरपदी विराजमान असून त्यांचा वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला आहे. मनपामध्ये महापौराचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असतो. यापूर्वी अनिल सोले व प्रवीण दटके यांनी अडीच-अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. गेल्या काही दिवसात नंदा जिचकार यांच्याबाबत सत्ताधारी पक्षातच विरोधाचे सूर दिसून येत आहेत. ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले यांनी मनपा सभागृहात शहरात जलसंकटासाठी महापौरांना दोषी ठरविले होते व त्यानंतर महिला नगरसेवकांमध्ये महापौर बदलाची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे जिचकार यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पायउतार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नंदा जिचकार यांना महापौर पदावरून हटविण्याच्या मुद्यावर भाजपाचे मनपातील पदाधिकारी व ज्येष्ठ नेते दोन गटात विभागले आहेत. एका गटाला वाटते की, जिचकार यांना अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा तर दुसरा गट नवीन महिला नगरसेविकेला संधी देण्याच्या बाजूने आहे. प्रशासनावर त्यांचा वचक नसल्याचा आरोप वारंवार लावण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठक ीत महापौरांबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र निर्णय होऊ शकला नाही. महत्त्वाचे म्हणजे उपमहापौरपदाचा कार्यकाळ हा सव्वा वर्षाचा असतो. त्यामुळे नव्या उपमहापौराचा शोध सुरू झाला आहे. सध्या उपमहापौरपदी हलबा समाजाचे दीपराज पार्डीकर विराजमान आहेत. त्यांच्या बदलासह महापौरांनाही बदलले जाईल का, याबाबत भाजपामध्ये खलबते सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNanda Jichakarनंदा जिचकार