शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘हॉट संडे’; नवतपामुळे लाहीलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 09:52 IST

‘मे हीट’च्या तडाख्याने विदर्भातील जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने उपराजधानीत ४६ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देकूलरचा उपयोग नाही अक्षरश: आग ओकणाऱ्या या उन्हामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. तापमानामुळे घरांमध्ये कूलरचादेखील प्रभाव जाणवेनासा झाला आहे. सिलींग फॅन व टेबल फॅनमुळे तर आणखी गरम वाटत आहे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांना तर आणखी त्रास सहन करावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मे हीट’च्या तडाख्याने विदर्भातील जनजीवन होरपळून निघाले आहे. मागील चार दिवसापासून सातत्याने उपराजधानीत ४६ अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी तर पारा ४६.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. विदर्भात सर्वात जास्त तापमान नागपुरातच नोंदविण्यात आले. हवामान खात्याने विदर्भासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे येणारे दोन दिवस नागपूरकरांच्या परीक्षेचेच ठरणार आहेत.काय आहे नवतपा?उन्हाळ्याचे अखेरचे दिवस म्हणजे अंगावर काटा आणणारे ठरतात. याच दिवसात नवतपा सुरू होतो. नवतपा म्हणजे सूर्य जेव्ह ा रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्या कालावधीला नवतपा म्हणतात. हे नऊ दिवस असतात. ज्याची सुरुवात शनिवारी २५ मे पासून झाली आहे आणि ते ३ जूनला संपणार आहेत.नवतपा सुरू झाल्यापासून नागपूरमध्ये अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळपासूनच गरमी जाणवत असून रात्री उशिरापर्यंत उष्ण वातावरण आहे. रविवारी नागपुरात कमाल ४६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ३ अंशांनी अधिक होते तर किमान ३०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाचा मारा अन् काही अंशी झालेली ढगांची गर्दी यामुळे उकाड्यात वाढ दिसून आली. सध्या वातावरण कोरडे झाले आहे. अजून आठवडाभर तापमान ४६ अंशांहून अधिकच राहील व उष्णतेची लाट कायम असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे

२ अंशांहून अधिक वाढदरम्यान, मागील आठवडाभरात तापमानात दोन अंशांहून अधिक वाढ झाली आहे. २० मे रोजी नागपुरात ४४.२ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने पारा चढत गेला. लोकसभा निवडणूकांच्या निकालांच्या दिवशी ४६.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते.

 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल