शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बिल न दिल्यामुळे कोरोना संक्रमिताला केले बंधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:06 IST

रुग्णालयाचे बिल थकीत असल्याने एका वृद्धाला रुग्णालय प्रशासनाने बंधक बनवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित वृद्धाने पोलिसांशी संपर्क केल्यानंतरही कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे त्या वृद्धाने आत्महत्येचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्दे हॉस्पिटलने दिले ३.२५ लाख बिल : १० दिवसापासून मागत होता सुटी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रुग्णालयाचे बिल थकीत असल्याने एका वृद्धाला रुग्णालय प्रशासनाने बंधक बनवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित वृद्धाने पोलिसांशी संपर्क केल्यानंतरही कुठलीही मदत मिळाली नाही. त्यामुळे त्या वृद्धाने आत्महत्येचा इशारा दिला आहे.गोळीबार चौक येथील ६२ वर्षीय सुरेश भरडभुंजे १० ऑगस्ट रोजी कोरोना संक्रमणामुळे बजाजनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका मोठ्या रुग्णालयात भरती झाले. भरडभुंजे यांना मनपाच्या नियमानुसार उपचाराचा खर्च घेतला जाईल, असे सांगितले होते. त्यांनी भरती होतानाच लाख रुपये जमा केले होते. रुग्णालयाचा खर्च अधिक असल्याने व प्रकृतीतही सुधारणा झाल्याने भरडभुंजे १० दिवसापासून सुटी मागत होते. त्यानंतरही डॉक्टरांनी दोन लाख रुपये जमा करण्यास सांगितले. भरडभुंजे यांनी रुग्णालयने केलेले उपचार व औषधासंबंधित माहिती घेतल्यावर रुग्णालयाने विनाकारण मनमानी वसुली केल्याचे लक्षात आले. त्यांनी पैसे जमा करण्यास नकार दिला. भरडभुंजे यांनी आपल्या संपर्काच्या माध्यमातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्रकरणाची तक्रार केली. त्यांनी पोलिसांना फोन करून स्वत:च्या जीवाला हानी पोहचविण्याचा इशारा दिला. त्यानंतर सोमवारी सकाळी त्यांना सुटी देण्यात आली असे सांगण्यात आले. तात्काळ ६५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. सुटी मिळेल या अपेक्षेने भरडभुंजे यांनी रक्कमही जमा केली. १.६५ लाख रुपये जमा केल्यानंतरही त्यांना १.६० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. रुग्णालयाकडून होत असलेल्या मनमानीमुळे भरडभुंजे यांनी बजाजनगर पोलीस व नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. मंगळवारी सकाळी भरडभुंजे यांनी बजाजनगर ठाण्यात फोन केल्यानंतर तायडे नावाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालय सांगते हे ते ऐकून घ्या, असा सल्ला दिला. १.६० लाख न देता १ लाख रुपयात प्रकरण संपवून टाका असाही सल्ला दिला. सुटीसाठी दबाव बनवित असाल तर महामारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे भरडभुंजे दहशतीत आले. लोकमतशी बोलताना ते म्हणाले की मी बेरोजगार आहे. दहा दिवसांपासून सुटी मागत आहे. पण कुणीही ऐकून घेण्यास तयार नाही.एका दिवसाचा चार्ज ४५ हजारअशाच प्रकारे नंदनवन येथील एका खासगी रुग्णालयाने कोरोना संक्रमित एका परिवाराकडून प्रति व्यक्ती ४५ हजार रुपये एका दिवसाचे वसूल केले. एकाच रुममध्ये दोन लोकांना ठेवून ४५ हजार रुपये शुल्क आकारले. या कुटुंबातील सात ते आठ लोक संक्रमित होते. त्यांनी दोन ते पाच दिवस रुग्णालयात घालविले. हे रुग्णालय काही दिवसापासून चर्चेत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल