शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हॉस्पिटलच्या संपाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:26 IST

महानगरपालिकेच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनमधील जाचक अटींना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिल्याने व महानगरपालिका आयुक्तांना पुणे व ठाणेच्या धर्तीवर हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बुधवार १८ जुलै रोजी होणाऱ्या संपाला तूर्तास स्थगिती दिली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन : रजिस्ट्रेशनच्या जाचक अटीला घेऊन बसणार समिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेच्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनमधील जाचक अटींना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिल्याने व महानगरपालिका आयुक्तांना पुणे व ठाणेच्या धर्तीवर हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन करण्याच्या सूचना दिल्याने इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) बुधवार १८ जुलै रोजी होणाऱ्या संपाला तूर्तास स्थगिती दिली आहे.‘मुंबई नर्सिंग अ‍ॅक्ट एम ५९’मधील जाचक अटी व शर्तीमुळे खाटांची सुविधा असणाऱ्या हॉस्पिटलसाठी महापालिकेमध्ये रजिस्ट्रेशन करणे कठीण झाले आहे. याच्या विरोधात शहरातील खासगी हॉस्पिटल संचालकांनी ‘आयएमए’च्या नेतृत्वात बुधवारी एक दिवसीय संप करण्याची तयारी केली होती. परंतु मंगळवारी या विषयाला घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक बोलवली. ही बैठक आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या नेतृत्वात झाली. यावेळी आयएमए राज्याचे अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे, नागपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, डॉ. अभिजित अंभईकर, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. अनिल लद्धड, डॉ. कृष्णा पराते व डॉ. प्रकाश देव उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने हॉस्पिटल परवाना नुतनीकरणाच्या सर्व जाचक अटींबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. डॉ. दिसावल यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मनपाच्या जाचक अटींमुळे ७० ते ८० हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रखडले आहे. परिणामी, त्यांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यापासून ते विम्याचे ‘क्लेम’ करणेही अडचणीचे जात आहे. याला घेऊन आम्ही संपाची हाक दिली होती. विशेष म्हणजे, ‘चेंज आॅफ युज’मुळे जुने हॉस्पिटल अडचणीत आले आहे. परंतु पुणे आणि ठाण्यामध्ये तेथील मनपा आयुक्तांनी मधला मार्ग काढीत हॉस्पिटलांचे रजिस्ट्रेशन केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी याला गंभीरतेने घेत नागपूरच्या मनपा आयुक्तांशी फोनवर चर्चा केली. तसेच जाचक अटींना घेऊन समिती स्थापन करून तातडीने निर्णय घेण्याचा सूचनाही दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे तूर्तास संप मागे घेण्यात आला आहे. परंतु सप्टेंबरपर्यंत सर्व हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन न झाल्यास संपाचे हत्यार उपसण्यात येईल, असेही डॉ. दिसावल म्हणाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलStrikeसंप