शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

धंतोलीतील रुग्णालयांनी स्वत:च्या पर्किंग जागेवरच वाहने पार्क करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:55 IST

धंतोली परिसरातील रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात उपलब्ध पार्किंग जागेचा वापर फक्त वाहन पार्किंग करिताच करावा, इतर कुठल्याही प्रयोजनासाठी पार्किंग जागेचा वापर करू नये, अशी विनंती वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी डॉक्टर व त्यांच्या प्रतिनिधींना केली.

ठळक मुद्देवाहतूक विभागांनी आयोजित केली डॉक्टर व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोली परिसरातील रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात उपलब्ध पार्किंग जागेचा वापर फक्त वाहन पार्किंग करिताच करावा, इतर कुठल्याही प्रयोजनासाठी पार्किंग जागेचा वापर करू नये, अशी विनंती वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी डॉक्टर व त्यांच्या प्रतिनिधींना केली.वाहतूक परिमंडळ सीताबर्डी नागपूर शहर हद्दीतील हॉस्पिटल हब झालेल्या धंतोली भगातील अनधिकृत पार्किंग पासून उद्भवत चाललेली वाहतूक समस्या लक्षात घेता. तसेच त्यासंबंधाने उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेसंदर्भात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या आदेशान्वये सोमवारी वाहतूक विभाग (शहर)चे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी धंतोली परिसरातील हॉस्पिटल संचालक डॉक्टरांची सामान्य बैठक बोलावली होती.तेव्हा त्यांनी उपरोक्त विनंती केली. या बैठकीत डॉ. आशा बंग, डॉ. उमेश महाजन, अमरितपाल सिंग, डॉ. शिल्पा वरंभे आदींह ४० डॉक्टर व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.धंतोली परिसरात येणारी वाहने व संबंधित वाहने रहदारीच्या मार्गावर पार्क करण्यस प्रवृत्त होणार नाहीत, त्यापासून स्थानिक रहिवाशांना सुध्दा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. त्यामुळे हॉस्पिटलच्या पार्किंग जागेतच वाहने पार्क करायला लावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. धंतोली भगातील हॉस्पिटलमध्ये नियमितपणे मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका उपचारासाठी येतात. अशावेळी रुग्णवाहिका संबंधित हॉस्पिटलच्या समोरील रहदारीच्या मार्गावर उभी करण्यात येते. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर संबंधित हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनी रुग्णवाहिका व त्यासोबत आलेल्या वाहनांचे पार्किंग हॉस्पिटल व्यवस्थापनाने नेमून दिलेल्या जागेवरच करवून घ्यावे, हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना याबाबत अवगत करावे. शक्य असल्यास हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्या पार्किंग व्यवस्थेबाबत दर्शनीय भागात मार्गदर्शक फलक लावावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या.यावेळी डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. यात डॉ. रुपा बंग यांनी सुनील पान मंदिर ते आरती प्रोव्हिजन , भारुका भवन ते डॉ. पेंडसे कॉर्नर हे दोन्ही मार्ग दुहेरी वाहतुकीस अरुंद ठरत असून त्याठिकाणी काही प्रमाणात दुचाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याने त्रास निर्माण होतो. डॉ. शिल्पा वरंभे यांनी धंतोलीतील पादचारी मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरल्याकडे लक्ष वेधले.सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनीसुद्धा यावेळी धंतोलीतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलTrafficवाहतूक कोंडीDhantoliधंतोली