शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

रूग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला

By admin | Updated: May 30, 2014 01:02 IST

सायंकाळी मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदन केंद्राच्या फ्रिजरमध्ये न ठेवता रूग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी सामानाच्या खोलीमध्ये ठेवला. त्यामुळे रात्रभर उंदरांनी मृतदेह कुरतडला.

कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा : घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाईची मागणीगडचिरोली : सायंकाळी मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदन केंद्राच्या फ्रिजरमध्ये न ठेवता  रूग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी सामानाच्या खोलीमध्ये ठेवला. त्यामुळे रात्रभर उंदरांनी मृतदेह  कुरतडला. रूग्णालय प्रशासनाच्या या कारभाराविषयी नातेवाईकांनी तिव्र संताप व्यक्त केला असून  यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मारोडा येथील रंगूबाई पांडुरंग पेदापल्लीवार (६५) या  महिलेला बुधवारी दुपारच्या सुमारास किटकाने चावा घेतल्याने तिला मूल येथे हलविण्यात आले.  मात्र तिची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने मूल येथील डॉक्टरांनी तिला गडचिरोली येथील  रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला सायंकाळी ५ वाजता गडचिरोली येथे  आणण्यात आले. मात्र अवघ्या एका तासातच तिचा मृत्यू झाला. सदर मृतदेहाचा पंचनामा गुरूवारी सकाळी करायचा  असल्याने रूग्णालय प्रशासनाने तिचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह रात्रभर रूग्णालय  प्रशासनाच्या ताब्यात राहत असेल तर तो मृतदेह रूग्णालय परिसरात असलेल्या शवविच्छेदन  केंद्रात ठेवणे आवश्यक होते. शवविच्छेदन केंद्रात सध्या स्थितीत चार फ्रिजर आहेत.  मात्र रूग्णालयात प्रशासनातील कर्मचार्‍यांनी रंगूबाईचा मृतदेह शवविच्छेदन केंद्रात न नेता तो  रूग्णालयाच्या तळमजल्यावर असलेल्या २५ क्रमांकाच्या खोलीमध्ये ठेवला. रात्रभर खोलीतील उदरांनी रंगूबाईच्या मृतदेहाचे लचके तोडले. रंगूबाईचा चेहरा कुरतुडून विद्रूप  केला. एवढेच नाही तर डोळ्याचा भागही कुरतडून ठेवला. एका हातावरचे मांस फस्त केले.  चेहर्‍यावरचे मास उंदरांनी खाल्याने रंगूबाईला ओळखणेही कठीण झाले होते. शवविच्छेदन केंद्राकडे मृतदेह घेऊन जाण्यासाठी मृतदेह बाहेर काढल्यानंतर हा प्रकार लक्षात  आला. रंगूबाईचा चेहरा पाहून नातेवाईकांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. काही नातेवाईकांनी  रूग्णालय प्रशासनाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी यांच्याशी संपर्क साधला असता  त्यांचा भ्रमणध्वनी स्विचऑफ होता व ते चामोर्शी येथे दौर्‍यावर असल्याची माहिती रूग्णालयाच्या  प्रशासनाने दिली. रूग्णालयातील जबाबदार लोकांनी जिल्हा शल्य चिकित्सक बैठकीत आहेत, असे सांगितले.  त्यामुळे त्यांची बाजू जाणून घेता आली नाही. (नगर प्रतिनिधी)