शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीशी झालेल्या भांडणाचे भीषण पर्यवसान : वडिलांनी केली दोन मुलांची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:54 IST

दारू पिण्याच्या विषयावरून पत्नीसोबत सकाळी झालेल्या भांडणाचे पर्यवसान दारूड्या नवऱ्याने त्याच्या पोटच्या दोन चिमुकल्यांची विहिरीत फेकून हत्या करण्यात झाले. समाजनमन सुन्न करणारी ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, इसासनी -वाघधरा येथे गुरुवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देनागपूरच्या एमआयडीसी भागात थरार, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दारू पिण्याच्या विषयावरून पत्नीसोबत सकाळी झालेल्या भांडणाचे पर्यवसान दारूड्या नवऱ्याने त्याच्या पोटच्या दोन चिमुकल्यांची विहिरीत फेकून हत्या करण्यात झाले. समाजनमन सुन्न करणारी ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, इसासनी -वाघधरा येथे गुरुवारी सकाळी घडली. संतोष लक्ष्मण मेश्राम (वय ३१) असे नराधम पित्याचे नाव असून, तो हिंगणा मार्गावरील राजीवनगरात राहतो. त्याच्या निर्दयीपणाला बळी पडलेल्या मुलांची नावे हर्षकुमार (वय ६ वर्षे)आणि प्रिन्सकुमार (वय ४ वर्षे), अशी आहेत. दुपारी उघड झालेल्या या भयावह घटनेने परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी आरोपी संतोष मेश्रामला अटक केली आहे.संतोष मेश्राम हा त्याची पत्नी सरिता मेश्राम (वय ३२) हर्षकुमार आणि प्रिन्सकुमार या दोन चिमुकल्यांसह वाघधरा येथे राहात होता. मनात येईल तर कामाला जायचे, नाही तर दारूच्या नशेत पडून राहायचे,अशा वृत्तीच्या संतोषने घरातील वातावरण अस्वस्थ केले होते. संसाराचा गाडा ओढण्यासाठी सरिता एमआयडीसीतील एका कंपनीत रोजंदारीवर काम करायची. संतोष दारूच्या व्यसनाच्या अधीन होता. भल्या सकाळीच तो दारू दुकानात जायचा. आज सकाळी ५.३० च्या सुमारास तो झोपेतून उठला आणि जवळ असलेले पैसे घेऊन दारू पिण्यासाठी निघून गेला. ६ च्या सुमारास तो टुन्न होऊन घरी परतला. तेव्हा सरिताने त्याला जाब विचारला. घरात खायला धान्य आणत नाही आणि दारू प्यायला भल्या सकाळी जातो, कसे होईल अशाने, असे तिने विचारले. त्यावरून पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. ते ऐकून झोपेतून उठलेली दोन्ही चिमुकली रडू लागली. यावेळी त्यांना संतोष दुकानात घेऊन गेला आणि दोघांना दोन बिस्किटचे पुडे घेऊन दिले. ८ वाजता घरी आल्यानंतर मुलांच्या हातात बिस्किटचे पुडे पाहून पत्नीने ते त्यांच्या हातून हिसकावून घेतले. त्यामुळे सरिता आणि संतोषचे पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. तू मुलाला बिस्किटमध्ये विष घालून मारू शकतो,असा आरोप सरिताने लावला. त्यावरून हा वाद टोकाला गेला.दरम्यान, नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता कामावर जायचे असल्यामुळे सरिताने मुलांना तयार केले. त्यांना जेवू घातले आणि स्वत:चा टिफीन घेत या दोघांना मावशी (सरिताची बहीण) रंजिता हिच्या घरी नेऊन सोडले. तेथे मुलांचे कोडकौतुक करून सरिता कामावर निघून गेली. काही वेळेनंतर सरिताला रंजिताचा फोन आला. तू कशाला नवऱ्यासोबत भांडण केले, असे तिने विचारले. सरिताने तिला तुला कसे कळले, असे विचारले असता तिने संतोष रागात आपल्या घरी आला आणि दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेला, असे सांगितले. ते ऐकून सरिताला काही तरी आक्रित घडणार असे संकेत मिळाले की काय, ती कामावरून लगेच घरी परतली. तेव्हा संतोष घरासमोर फिरत असल्याचे तिला दिसले. तिने त्यांना मुलांच्या बाबतीत विचारले तेव्हा त्याने काहीही सांगितले नाही. परिणामी दोघांचे रस्त्यावरच भांडण सुरू झाले. शेजाऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दोन बीट मार्शल तेथे पोहोचले. रस्त्यावरची गर्दी पाहून त्यांनी भांडण करणाऱ्या पती-पत्नीला पोलीस ठाण्यात नेले. सरिताने आपली दोन्ही मुले संतोषने कुठे नेऊन सोडली, त्यांचे काय झाले, ते पतीला विचारा, असे म्हटले. त्यामुळे पोलिसांनी संतोषला विचारपूस सुरू केली....अन् पोलिसही हादरले!तो दारू पिऊन असल्याने काही सांगत नव्हता. त्याची दारू उतरावी म्हणून पोलिसांनी त्याला चहा पाजला. त्यानंतर पुन्हा विचारपूस केली. यानंतर संतोषने दिलेल्या माहितीने पोलिसही हादरले. दोन्ही मुलांना घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माधव नगरीतील एका पडक्या विहिरीत नेऊन फेकल्याचे तो म्हणाला. ते ऐकून पोलिसांनी लगेच त्याला विहिरीजवळ नेले. आतमध्ये एक जनावर पडून दिसले. मुले दिसत नव्हती. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर दोन चिमुकल्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.सरिताची हरविली शुद्धकाही वेळेपूर्वीच लाडकौतुक केलेल्या मुलांचे मृतदेह पाहून सरिताने हंबरडा फोडला, नंतर ती बेशुद्ध पडली. तिला पोलिसांनी पाणी पाजून शुद्धीवर आणले. यावेळी तिची अवस्था पाहवली जात नव्हती. नवऱ्याच्या रूपात पोटच्या मुलाचा काळ बनलेल्या संतोषकडे तिने धाव घेतली. तिला महिला पोलिसांना कसेबसे आवरले. दरम्यान, या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी संतोषला अटक केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून