शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

नंदनवनमध्ये भीषण हत्या

By admin | Updated: May 31, 2016 02:39 IST

जुन्या वादातून नंदनवनमधील एका तरुणाची दोघांनी भीषण हत्या केली. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप

नागपूर : जुन्या वादातून नंदनवनमधील एका तरुणाची दोघांनी भीषण हत्या केली. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय अहवालाने आरोपीचे पाप उघड झाले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास हा थरार घडला. चंद्रशेखर मधुकर मालोदे (वय २७) असे मृताचे नाव आहे. तो विजयालक्ष्मी पंडितनगरात राहत होता.चंद्रशेखरचा भाऊ राजेंद्र मधुकर मालोदे (वय ३५) हे कंत्राटदार असून, आरोपी नीतेश भरतलाल शाहू (वय २५) तसेच अजय भरतलाल शाहू (वय २७) हे सहकारनगरात राहतात. ते पेंटिंगचे काम करतात. या दोघांचा मालोदे बंधूशी वाद होता. त्याची पोलीस ठाण्यात तक्रारही झाली होती. ९ मे रोजी त्याची कोर्टाची तारीख होती. आरोपी शाहू तारखेवर हजर झाले नाही. त्यामुळे पोलिसांकडून पकड वॉरंट निघणार, अशी माहिती मिळाली होती. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही माहिती सांगण्यासाठी चंद्रशेखर आणि त्याचा मित्र चेतन सुपारे आरोपीच्या घरी गेले. तू कोर्टात का गेला नाही, तुझा आता पकड वॉरंट निघणार आहे, असे म्हणताच आरोपी नीतेश याने चंद्रशेखरला शिवीगाळ करून कानशिलात लगावली. तू माझ्या घरी आलाच कसा, अशी विचारणा करून आरोपीने त्याला जमिनीवर पाडून डोके रस्त्यावर ठेचले. मित्राच्या मदतीसाठी चेतन धावला असता आरोपी अजय शाहूने त्याला पकडून ठेवले तर, नीतेशने घरातून चाकू आणून चंद्रशेखरवर सपासप वार केले. काही वेळेनंतर चेतन, मनोज आणि आरोपी अजयने चंद्रशेखरला आॅटोत घालून मेडिकलमध्ये नेले. तेथे चंद्रशेखरचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे आरोपी शाहू पळून गेला. (प्रतिनिधी)घरच्यांचा आक्रोश घटनेची माहिती चेतनने मालोदे कुटुंबीयांना दिली. त्यांनी रुग्णालयात पोहचून एकच आक्रोश केला. माहिती कळताच पोलिसही मेडिकलमध्ये पोहचले. डॉक्टरांनी त्यांना हा अपघात नसून हत्या असल्याचे सांगितले. त्यामुळे उपनिरीक्षक अंबुरे, एस. कोचोडे, मनोज घोडे, राकेश शिर्के, अतुल पित्तलवार, विश्वनाथ कुथे, आशिष आणि प्रफुल्ल वाघमारे यांनी रात्रभर धावपळ करून आरोपी नीतेश आणि अजयच्या मुसक्या बांधल्या. या घटनेमुळे रात्रीपासून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.