शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आशा स्वयंसेविका मेडिकल किटपासून वंचित

By admin | Updated: August 7, 2014 23:00 IST

अकोला जिल्ह्यातील ११४५ आशा स्वयंसेविकांना अद्यापही मेडिकल किटचे वितरण करण्यात आलेले नाही.

सायखेड: आरोग्य सेवेशी संलग्न असलेल्या व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात ग्रामपंचायत स्तरावर सतत सेवा देणार्‍या अकोला जिल्ह्यातील ११४५ आशा स्वयंसेविकांना अद्यापही मेडिकल किटचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी, ग्रामपातळीवरील रुग्ण तातडीच्या औषधोपचारापासून वंचित आहेत. आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना गरोदर मातांना प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करणे, सिकलसेल आजाराबाबत ग्रामीण नागरिकांना मार्गदर्शन करणे, बालकांना पोलिओसह विविध आजाराच्या लस देणे व त्यांची नोंद ठेवणे, कुष्ठरोग, क्षयरोगांच्या रुग्णांवर औषधोपचार करणे, या कामांसह आरोग्य यंत्रणेने ठरवून दिलेल्या जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. ग्रामीण भागात उद्भवणारे हिवताप, अतिसार, डायरिया, खोकला, ताप यासह जखमा आदीवर तातडीने तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार करण्यासाठी आशा स्वयंसेविकांना मेडिकल किटचे वाटप करण्यात येते; परंतु, यावर्षी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना या किटचे वाटप अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागात अनेक आजारांनी लोक आजारी पडत आहेत. त्यांना आशा स्वयंसेविकांकडे तातडीचे उपचार करण्यासाठी मेडिकल किट असल्याची माहिती मिळाल्यामुळे असे रुग्ण आशा स्वयंसेविकांकडे उपचाराच्या आशेने येत आहेत; परंतु आशांकडे उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली मेडिकल किटच उपलब्ध नसल्यामुळे उपचाराअभावी त्यांची निराशा होत आहे. या बाबीची दखल घेऊन आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविकांना त्वरित मेडिकल किटचे वाटप करावे, अशी मागणी केली जात आहे.