शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

‘स्मार्ट’साठी आशेचा किरण

By admin | Updated: January 30, 2016 03:12 IST

‘स्मार्ट सिटी’च्या मुख्य परीक्षेत नापास झाल्यानंतर आता पुरवणी परीक्षेत पास होण्यासाठी नागपूर महापालिकेने धडपड सुरू केली आहे.

सुधारित प्रस्ताव पाठविणार : सहा महिन्यात गुड न्यूज नागपूर : ‘स्मार्ट सिटी’च्या मुख्य परीक्षेत नापास झाल्यानंतर आता पुरवणी परीक्षेत पास होण्यासाठी नागपूर महापालिकेने धडपड सुरू केली आहे. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट होण्याची नागपूरला आणखी एक संधी आहे. त्यासाठी जूनपर्यंत सुधारित प्रस्ताव पाठवावा लागणार असून आॅगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये निवडीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कॅबिनेट सचिव प्रदीपकुमार सिन्हा यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या चर्चेत याचे संकेत मिळाले असून सहा महिन्यात नागपूरकरांना गुड न्यूज ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. नागपूरचा क्रमांक पहिल्या दहा शहरांमध्ये लागेल, अशी स्वप्ने उराशी बाळगून असलेल्यांना गुरुवारी जोरदार झटका बसला. गडकरी आणि फडणवीसांचे शहर वगळल्या गेले यावर विश्वास ठेवायला नागपूरकर तयार नाहीत. स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेली देशातील २० शहरे ही १२ राज्यातील आहेत. २३ राज्यातील एका शहराचा समावेश या प्रकल्पात करण्यात आलेला नाही. एवढी एकच बाब नागपूरच्या अपयशावर फुंकर घालणारी आहे. प्राप्त माहितीनुसार आता प्राधान्याने संबंधित २३ राज्यातील शहरांची आपसात जलद स्पर्धा (ह्यफास्टट्रॅक कॉम्पिटिशन) घेतली जाईल. यासाठी या शहरांना १५ एप्रिलपर्यंत सुधारित प्रस्ताव सादर करावे लागतील. यानंतर उरलेल्या ५४ शहरांना १५ जूनपर्यंत सुधारित प्रस्ताव सादर करावे लागतील. या सुधारित प्रस्तावामध्ये नागपूरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यासाठी पूर्वीच्या प्रस्तावात महापालिका कुठे कमी पडली, कोणत्या मुद्यांवर महापालिकेचे गुण कमी झाले याचा सखोल अभ्यास केला जाणार असून प्रत्येक मुद्दा सक्षम करून प्रस्ताव सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पॉन्डीचेरी, चंदीगड आणि नागपूर या शहरांकरिता करार करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या पाच ‘स्मार्ट सिटी’करिता युनायटेड स्टेट आणि फ्रान्स या देशांसोबत करारही करण्यात आले होते. मात्र, यापैकी एकाही शहराचा नंबर लागलेला नाही.पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यामुळे फ्रान्ससोबत झालेल्या करारावर कुठलाही परिणाम होणार नाही, असा दावा महापौर प्रवीण दटके यांनी केला आहे. (प्रतिनिधी)फेब्रुवारीत फ्रान्सचा दौरास्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहराचा फ्रान्ससोबत करार झाला आहे. या प्रकल्पासाठी फ्रान्स संपूर्ण तांत्रिक साहाय्य पुरविणार आहे. फ्रान्सने त्यांच्या देशातील स्मार्ट शहरे बघण्यासाठी महापालिकेला निमंत्रण दिले आहे. त्यानुसार महापालिकेचे अधिकारी फेब्रुवारीमध्ये फ्रान्सचा दौरा करणार आहेत.