शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

नागपुरात हुक्का, ई-सिगारेट विक्रीचे रॅकेट, ‘टेक्सास’वर कारवाईची कुऱ्हाड

By योगेश पांडे | Updated: May 28, 2025 23:09 IST

१७ दुकानांमध्ये धाड, ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त : ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत नागपूर पोलिसांची कारवाई

योगेश पांडे

नागपूर : मागील काही दिवसांपासून शहरात गांजा, ई-सिगारेट्स, हुक्क्याचे साहित्य विक्रीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत होते. पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत ‘टेक्सास’ नावाच्या ‘स्मोक शॉप’च्या १७ दुकानांवर धाडी टाकल्या. पोलिसांना या कारवाईत मोठ्या प्रमाणावर हुक्का, ई-सिगारेट इत्यादी साहित्य आढळले. दिवसभरात पोलिसांनी १७ ठिकाणी कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली होती.

नागपूर पोलिसांनी काही दिवसांपासून ‘ऑपरेशन थंडर’ राबविण्यास सुरुवात केली. त्याअंतर्गतच ‘मिशन एक्स’ची आखणी करण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना ‘वेब सप्लाय’च्या माध्यमातून ई-सिगारेट व हुक्का यांचा ‘टेक्सास’मध्ये साठा होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी खबऱ्यांच्या माध्यमातून याची खातरजमा केली. टेक्सासच्या स्मोक शॉप्समधून ई-सिगारेट, हुक्का, गांजा पेपर, चारकोल, टोबॅको फ्लेवर, निकोटिन लिक्विड्स, गन टाईप लायटर अशा एकापेक्षा एक धोकादायक व प्रतिबंधित वस्तू खुलेआम विकल्या जात असल्याचे समोर आले. काही ठिकाणांहून तर घरपोच सेवा सुरू असल्याचीदेखील बाब निदर्शनास आली.

पोलिसांनी १७ दुकानांवर धाड टाकण्याचे नियोजन केले. २७ मे रोजी सायंकाळी कारवाईला सुरुवात झाली. पोलिसांनी या कारवाईत टेक्सास स्मोक शॉपच्या १३ ठिकाणी, एका गोडाऊनमध्ये तसेच दोन पान मटेरियल दुकाने अशा एकूण १७ ठिकाणी छापेमारी केली. एकूण ३२ जागांवर झडती घेण्यात आली. तेरा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण २६ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ई-सिगारेट तसेच हुक्का पॉट, हुक्का फ्लेवर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. एकूण १६ ठिकाणांहून मिळून मोबाईल फोन, मोपेड वाहन, हुक्का साहित्य असा एकूण ४३.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दीडशे पोलिस अन् १६ पथके

‘ऑपरेशन एक्स’साठी एकाच वेळी पोलिसांची १६ पथके कारवाईसाठी निघाली. यात दीडशेहून अधिक पोलिस अधिकारी-कर्मचारी होते. पोलिस आयुक्त स्वत: या कारवाईवर लक्ष ठेवून होते. प्रत्येक पथकात गुन्हे शाखेतील एक अधिकारी, तीन अंमलदार व स्वत: आयुक्तांनी नियुक्त केलेला कर्मचारी होता. या कारवाईबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. कोणत्याही पथकाला एकमेकांबद्दलची माहिती देण्यात आली नाही. प्रत्येक पथकाला फक्त एका पोलिस स्टेशनच्या नावाचा लिफाफा दिला गेला.

या ठिकाणी झाली कारवाई

पोलिस ठाणे : पत्ता : जप्त मुद्देमाल

एमआयडीसी : टेक्सास शॉप, यशोदानगर, टाकळी सीम : २.९७ लाख

प्रतापनगर : टेक्सास शॉप, गॅलेक्सी मर्श अपार्टमेंट, माटे चौक : २.४५ लाख

प्रतापनगर : टेक्सास शॉप, पराते कॉम्प्लेक्स, वेंकटेशनगर : ३.४१ लाख

सीताबर्डी : टेक्सास शॉप, झेंडा चौक, अग्रसेन मार्ग : १.०५ लाख

सदर : टेक्सास शॉप, व्हीसीए स्टेडियम : १० हजार

सदर : चौरसिया पान शॉप, छावणी : ४२ हजार

गिट्टीखदान : कुमार रेसिडेन्सी, दाभा मार्ग : २९ हजार

लकडगंज : टेक्सास शॉप, वैष्णोदेवी चौक : ३२ हजार

सक्करदरा : टेक्सास शॉप, भांडे प्लॉट : २.०८ लाख

सक्करदरा : टेक्सास शॉप, छोटा ताजबाग, दिघोरी : २.०८ लाख

अजनी : टेक्सास शॉप, रक्षक मार्केट, मानेवाडा चौक : २.१८ लाख

वाठोडा : टेक्सास शॉप, चामट चक्की चौक : ४२ हजार

हुडकेश्वर : टेक्सास शॉप, बेसा पिंपळा मार्ग : ८२ हजार

बेलतरोडी : टेक्सास शॉप : ३.६६ लाख

नंदनवन : गोलू पान पॅलेस : ३९ हजार

नंदनवन : गोडाऊन, साईनगर : २१.५१ लाख

जरीपटका : टेक्सास शॉप, हिरानगर चौक : १.२२ लाख

मंदिराखाली तयार केले तळघर

मुख्य सूत्रधार आशिष उर्फ अंकुश अमृतलाल शाहू याने नागपूर शहरात पाच ते सहा वर्षांपूर्वी ही फ्रँचाइझी सुरू केली होती. शाहू याच्या राहत्या घरासमोर मंदिराखालील तळघरात तयार केलेल्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर हुक्का साहित्याचा साठा आढळून आला.