लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९वरील उपचारात अन्य औषधांना यश मिळत नसताना काही होमिओपॅथी औषधी प्रभाव ठरत असल्याचे समोर आले आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर होमिओपॅथी औषधांचा प्रयोग करण्यासाठी आयुष मंत्रालयाने परवानगी दिली आहे. नागपुरात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून उपचार करण्यासाठी ऑरेंज सिटी होमओपॅथी असोसिएशनकडून प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. सोनल पंचभाई म्हणाले, होमिओपॅथी असे प्रगत सायन्स आहे की, जे माणसाच्या रोगप्रतिकार शक्तीला वाढवून रोगासोबत लढण्याची ताकद देते. होमिओपॅथी सायन्स कोविडच्या रुग्णाच्या उपचारातही प्रभावी ठरू शकते. एवढेच नव्हे तर कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यास होमिओपॅथी मदतही करू शकते. कोविड होऊच नये किंवा झाला तरी कमीत कमी दिवसांत तो बरा करण्यास होमिओपॅथी औषध परिणामकारक ठरू शकते. होमिओपॅथी औषधांचा शरीरावर दुष्परिणाम होत नाही. गुंतागुंत निर्माण होत नाही. होमिओपॅथीच्या उपचाराची किंमतही फार कमी आहे. यामुळे कोविड रुग्णांच्या उपचारात होमिओपॅथीचा समावेश करणे गरजेचे आहे. ऑरेंज सिटी होमओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनीष पाटील म्हणाले, रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोरोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होमिओपॅथीचे ‘आर्सेनिक अल्बम-३०’ वितरित करण्याची परवानगी मिळाली आहे. परंतु कोविड रुग्णांवरील उपचारात सहायक औषधोपचार म्हणून होमिओपॅथीचा अंतरभाव केलेला नाही. गोवा व केरळमध्ये मात्र सहायक औषध म्हणून होमिओपॅथीची मदत घेतली जात आहे. नागपुरातही या पॅथीचा उपचारात अंतरभाव करण्यासाठी मनपा आयुक्तांना प्रस्ताव दिला आहे. त्यांच्याकडून हिरवी झेंडीची प्रतीक्षा आहे.
कोविड रुग्णांवर होमिओपॅथी प्रभावी असल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:11 IST
कोविड-१९वरील उपचारात अन्य औषधांना यश मिळत नसताना काही होमिओपॅथी औषधी प्रभाव ठरत असल्याचे समोर आले आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर होमिओपॅथी औषधांचा प्रयोग करण्यासाठी आयुष मंत्रालयाने परवानगी दिली आहे. नागपुरात जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून उपचार करण्यासाठी ऑरेंज सिटी होमओपॅथी असोसिएशनकडून प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.
कोविड रुग्णांवर होमिओपॅथी प्रभावी असल्याचा दावा
ठळक मुद्देऑरेंज सिटी होमओपॅथ असोसिएशनचा प्रस्ताव : आरोग्य विभागाकडून परवानगीची प्रतीक्षा