शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

होमहवन, दुर्गा पाठ व अखंड ज्योत

By admin | Updated: September 29, 2014 01:04 IST

शहरात ठिकठिकाणी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. अनेक मंदिरांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येत आहे. मंडळांनी ध्वजपूजा, दुर्गापाठ, होमहवन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

नागपूर : शहरात ठिकठिकाणी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. अनेक मंदिरांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येत आहे. मंडळांनी ध्वजपूजा, दुर्गापाठ, होमहवन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.पश्चिम नागपूर नागरिक संघ पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनगरातील श्रीराम मंदिरात १००१ अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. ज्योतीच्या आरासचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. इतरही भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक प्रवीण महाजन, मुकुंद सरमुकदम, वैभव नारखेडे, विशाल उमाळकर, नितीन अंधारे, अजय डबीर, विनोद जोशी, राजेंद्र पाठक, किरण देवपुजारी, जयंत आपटे, राजीव काळेले यांनी केले आहे. माँ तुळजा भवानी देवस्थानमनीषनगरातील देवस्थानमध्ये उत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २९ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबरदरम्यान रोज सकाळी आरती, श्रीमद्भागवतपुराण, भजन, रामलीला यासह मुलांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. ३ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता दशहरा भोजनदान कार्यक्रम पत्रकार भवन येथे होईल. ७ आॅक्टोबर रोजी उत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, भजनमंडळ व देवस्थानच्या सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर रामलीलेचा समारोप, कोजगिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. तुळजाभवानी देवस्थान पंचकमिटीपंचकमिटीतर्फे विश्वकर्मानगर येथे २९ ला देवीचे जागरण, ३० ला अंताक्षरी, १ आॅक्टोबर रोजी प्रवचन, २ रोजी सकाळी ८ वाजता महाष्टमी महापूजा, होमहवन, ३ रोजी सुवर्ण वितरण व पानसुपारी आणि ५ रोजी सायंकाळी ८ वाजता महाप्रसाद वितरण होणार आहे.श्री गणेश मंदिर टेकडीउपमहापौर मुन्ना पोकुलवार यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. रोज सायंकाळी ७.३० वाजता गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. रोज दुपारी १२.३०च्या आरतीनंतर साबुदाणा खिचडी, शिरा व दह्याच्या प्रसादाचे वितरण करण्यात येत आहे, याचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन लखीचंद ढोबळे, पुंडलिक जौंजाळ, के.सी. गांधी, मधुकरराव धवड, एस.बी. कुळकर्णी व माधव कोहळे यांनी केले. (प्रतिनिधी)