शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

'होमड्रॉप' उपक्रम स्थायी स्वरूपात राबवा  : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:31 AM

नागपूर पोलिसांतर्फे सुरू केलेला ‘होमड्रॉप’ उपक्रम स्थायी स्वरुपात राबविण्याचे निर्देश राज्यमंत्री गृह (शहरे), सतेज पाटील यांनी बुधवारी रविभवन येथील बैठकीत दिले.

ठळक मुद्देकायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर पोलिसांतर्फे सुरू केलेला ‘होमड्रॉप’ उपक्रम स्थायी स्वरुपात राबविण्याचे निर्देश राज्यमंत्री गृह (शहरे), सतेज पाटील यांनी बुधवारी रविभवन येथील बैठकीत दिले. पदभार स्वीकारल्यानंतरची नागपूर येथील पहिली आढावा बैठक त्यांनी घेतली.रात्री १० वाजल्यानंतर महिलांना वाहन उपलब्ध नसल्यास त्यांना ‘होमड्रॉप’ या सुविधेद्वारे महिला पोलिसांसह त्यांच्या घरी पोहोचविण्यात येते. या सुविधेला महिलांचा चांगला प्रतिसाद आहे. गेल्या महिन्यात ६७ महिलांना घरी सुखरूप पोहोचविण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. यावर महिलांना रात्री सुरक्षितरीत्या पोहोचविण्यासाठी केलेली ‘होमड्रॉप’ ही सुविधा उत्तम असून ही स्थायी स्वरुपात करण्याची सूचना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली.२०१९ मधील गुन्ह्यांची माहिती, डिटेक्शन टक्केवारी, प्रतिबंधक कारवाई, पोलिसांनी राबविलेले उपक्रम व भविष्यातील नियोजनाची माहिती आयुक्तांनी दिली.२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये एकूण गुन्ह्यात दहा टक्क्याची घट झाली आहे. २०१९ मध्ये एमपीडीए व ३३ इसमांना स्थानबद्ध करण्यात आले होते तर ‘मकोका’ अंतर्गत २०१९ मध्ये १३ गुन्हेगारी टोळ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.भरोसा सेल, हितगूज कार्यक्रम, छात्र पोलीस उपक्रम, केअर, कम्युनिटी पोलिसिंग आदी उपक्रमाबाबत गृहराज्यमंत्री पाटील यांनी जाणून घेतले.यावेळी नियोजनाने व चांगल्या पद्धतीने काम करण्याच्या सूचनाही गृहराज्यमंत्री महोदयांनी दिल्यात. या बैठकीला पोलीस आयक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, सह पोलीस आयुक्त रवींद्र् कदम, पोलीस अधीक्षक राकेश ओला यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHome Ministryगृह मंत्रालय