काटाेल : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत साेने-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाखाचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना काटाेल शहरातील शनिचाैक परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.
चंद्रशेखर माेतीराम टिपले (रा. शनिचाैक, कुंभारपुरा काटाेल) हे शुक्रवारी कुटुंबीयांसह कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले हाेते. त्यांच्या घरी कुणीच नसताना चाेरट्याने कुलूप ताेडून घरात प्रवेश केला. यात चाेरट्याने घरात ठेवलेले ७५ हजार रुपये किमतीची साेन्याची पाेत, ३९ हजारांच्या तीन अंगठ्या, तीन हजार रुपये किमतीचे कानातील मनी, चांदीच्या पाटल्या व इतर दागिने असा एकूण एक लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. दरम्यान, शनिवारी सकाळच्या सुमारास टिपले कुटुंबीय घरी आले असता, घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. घरात चाेरी झाल्याची बाब लक्षात येताच टिपले यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, ठाणेदार महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे करीत आहेत.