शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्तीविरोधी अध्यादेशाची होळी

By admin | Updated: June 21, 2017 02:34 IST

शेतकरी संघटनेची कोर कमिटी आणि शासनाच्या मंत्रिगटात कर्जमुक्ती व इतर प्रश्नावर झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे.

सातबारा कोरा करा : शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समिती लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकरी संघटनेची कोर कमिटी आणि शासनाच्या मंत्रिगटात कर्जमुक्ती व इतर प्रश्नावर झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यात कोर कमिटीने सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध नोंदवून पुन्हा राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने गत १४ जून रोजी शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे तात्पुरते कर्ज देण्यासंबंधी जारी केलेल्या अध्यादेशाची शेतकरी संघटनेच्या गिरीपेठ येथील कार्यालयासमोर होळी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष राम नेवले, अरुण केदार, अ‍ॅड़ नंदाताई पराते, राजकुमार नागुलवार, जयंतराव चितळे, राम घोडे, भैयालाल माकडे, महेंद्र भांगे, वसंतराव कांबळे, अरविंद क्षीरसागर, नरेंद्र सरोदे, दिलीप घोरमारे, मुकेश मासोरकर, दिलीप वेळेकर, अरुण खंगार, डॉ. गिरीश सहस्रबुद्धे, वनश्री सिडाम, दीपक गोतमारे, अण्णाजी राजेधर, सुनील चोखारे, अ‍ॅड़ आर. जे. बेलेकर, बाबुराव गेडाम उपस्थित होते. यावेळी राम नेवले म्हणाले, सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय शेतकरी आंदोलन थांबणार नाही. सरकारने काढलेल्या जीआरमधील अटी-शर्तीनुसार ५० टक्के शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होऊ शकत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रश्नावर सरकारशी दोन बैठका झाल्या, चर्चा झाली . परंतु सरकार प्रत्येकवेळी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याची नीती अवलंबून लहान शेतकरी व मोठा शेतकरी असा भेदभाव करीत आहे. एकिकडे शेतकरी मरत आहे. शेतकऱ्यांकडे पेरणीला पैसा नाही. अशावेळी संपूर्ण सातबारा कोरा करून त्वरित नवीन कर्ज उपलब्ध करून देणे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र असे असताना सरकार तसे न करता कर्जमुक्तीसाठी जाचक अटी लादत आहेत. यावरून सरकारला कर्जमुक्ती द्यायची नाही, हे स्पष्ट होते, असेही नेवले म्हणाले. आंदोलन सुरूच राहणार आमदार व मंत्र्यांना मानधन वाढ देताना आयकर भरणाऱ्यांना मानधन वाढ व पेन्शन दिल्या जाणार नाही, केवळ लहान आमदारांनाच मानधन वाढ दिली जाईल, असा निर्णय कधीही होत नाही. मग केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकार लहान आणि मोठा शेतकरी असा भेदभाव कसे करू शकतात, असा यावेळी नेवले यांनी प्रश्न उपस्थित करून, संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आंदोलन पुढेही सुरूच राहणार असल्याची यावेळी त्यांनी घोषणा केली.