शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
2
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पाहरा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
3
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
4
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
5
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
6
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
7
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
8
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
9
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
10
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
11
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
12
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
13
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
14
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
15
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
16
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
17
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
18
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
19
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
20
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी

एचआयव्हीचे प्रमाण घटले, धोका वाढला!

By admin | Updated: December 1, 2015 07:13 IST

सरकारी आणि सामाजिक संस्थांनी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे राज्यातील एड्सचे प्रमाण कमी झाले आहे.

स्वयंसेवी संस्थांचे अनुदान बंद : नियंत्रण व उपाययोजना करण्याचे कार्य प्रभावितनागपूर : सरकारी आणि सामाजिक संस्थांनी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे राज्यातील एड्सचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु गेल्या आठ महिन्यांपासून या सामाजिक संस्थांना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) अनुदानासह कंडोम, गुप्तरोगाच्या किटस्, टेस्टिंग सिरींज आदी साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने एचआयव्हीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मानधन मिळत नसल्याने अनेक संस्थांनी जनजागृतीचे व बाधितांना आवश्यक माहिती देण्याचे कार्य बंद केले आहे. राज्यात एप्रिल २०१३ ते जानेवारी २०१४ या काळात देहविक्रय करणाऱ्या ७७,५६७ महिलांची तपासणी करण्यात आली. यात ६५ महिलांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच समलिंगी संबंध असणाऱ्या २६,६१८ जणांची तपासणी झाली. त्यांपैकी १५ जणांना, इंजेक्शनद्वारे नशा करणाऱ्या २,३१९ पैकी ४ आणि ८६,८०३ ट्रकचालकांपैकी १२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे.शून्य संसर्ग, मृत्यू आणि गैरसमज आदींवर भर दिला जात आहे. गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीचा विचार करता, एचआयव्ही/एड्सचे रुग्ण घटल्याचे जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेचे म्हणणे आहे. याचे श्रेय राज्यात एचआयव्हीवर नियंत्रण व उपाययोजना करण्याचे कार्य करणाऱ्या संस्थांना दिले जाते. राज्यात अशा १५४ स्वयंसेवी संस्था आहेत. यातील नागपुरात १४ आहेत. यात रेड क्रॉस सोसायटी युनिट - १, युनिट - २, गौरव संस्था, ऐबेआरजीन, सारथी ट्रस्ट, भारतीय आदिम जाती सेवक संघ, आयआयवायडब्ल्यू, सीआरटी डीपी, सह्याद्री संस्था, मानव विकास संस्थांचा समावेश आहे. या संस्थांमध्ये जवळपास ३००० कौन्सिलर आणि इतर कर्मचारी कार्यरत आहेत. नॅकोकडून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला (एम-सॅक) आणि येथून या संस्थांना दर सहा महिन्याने अनुदान दिले जाते. परंतु गेल्या फेब्रुवारी, मार्च आणि जून ते नोव्हेंबरपर्यंतचे असे आठ महिन्यांचे अनुदानच देण्यात आले नाही. याशिवाय गुप्तरोगाच्या किटस् (एसटीआय), कंडोम्स, रक्ताच्या चाचणीसाठी टेस्टिंग सिरीज व ट्यूब आदींच्या मागणीनुसार फारच कमी पुरवठा होत असल्याने कार्यकर्ते अडचणीत आले असून, त्यांच्यावरील जबाबदारींवर याचा परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)अडचणी वाढल्या४नागपूरच्या ‘रेड लाईट एरिया’मध्ये सुमारे चार हजार वारांगना आहेत. यातील सुमारे १२५ वारांगना एचआयव्हीबाधित आहेत. या भागात महिन्याकाठी एक-दीड लाख कंडोमची गरज भासते. परंतु येथे काम करणाऱ्या संस्थेला गेल्या आठ महिन्यात केवळ दीड लाख कंडोम पाठविण्यात आले आहे. याचा परिणाम, एचआयव्ही वाढण्यास मदत होण्याची दाट शक्यता आहे, असे मत या भागात काम करणाऱ्या संस्थेच्या कार्यकर्त्यांचे आहे.