शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नागपुरात एचआयव्हीबाधितांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 23:41 IST

‘एड्स नियंत्रण सोसायटीच्या समुपदेशन  केंद्रावर (एआरटी) एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला

ठळक मुद्देएआरटी केंद्रावर औषधांचा तुटवडा : स्थानिक पातळीवरून खरेदीलाही उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एचआयव्हीबाधितांनी नियमीत औषधी घेतल्यास विषाणूची वाढ होण्याची प्रक्रिया थांबते. ‘एआरटी ड्रग्स’ योग्य पद्धतीने व नियमित घेणे हा या उपचाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु ‘एड्स नियंत्रण सोसायटीच्या समुपदेशन  केंद्रावर (एआरटी) एचआयव्हीबाधितांना नि:शुल्क मिळणाऱ्या औषधांचा तुटवडा पडला आहे. बाहेर या औषधांच्या किमंती सामान्यांना परडवणाऱ्या नाहीत. परिणामी, रुग्णांचा जीव टांगणीला लागला असून रोग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एचआयव्ही पॉझीटिव्ह म्हणून जगताना बहुतेकदा अज्ञान आणि गैरसमजापोटी औषधांबाबत रु ग्णांमध्ये जागरु कता नसते. नि:शुल्क मिळणारे औषध अचानक बाहेरून विकत घेण्यास त्यांची मनस्थिती नसते. काहींची आर्थिक परिस्थीती नसते. फार कमी जण पदरमोड करून बाहेरून औषध विकत घेतात. याचा परिणाम, आजार वाढण्यावर होतो. मेडिकल, मेयोसह सर्वच ‘एआरटी सेंटर’वर गेल्या काही महिन्यांपासून एचआयव्हीबाधितांसाठी फारच आवश्यक असलेले ‘नेव्हीरॅपीन-२००’ व ‘झेएलई’ यासह इतरही औषधांचा तुटवडा पडला आहे. सुत्रानूसार काही दिवसांपूर्वी औषधांचा पुरवठा करणाऱ्या ‘नॅशनल एड्स कंट्रोल सेंटर’ने (नॅको) दोन महिने औषधांचा पुरवठा सुरळीत होणार नाही याची माहिती देवून स्थानिकस्तरावर औषधांची खरेदी करण्यासाठी निधी दिला. परंतु मेडिकलच्या औषधवैद्यकशास्त्र विभागातील प्रमुखांची सेवानिवृत झाल्यानंतर त्यांच्या जागेवर आलेल्या नव्या प्रमुखांच्या नावाचे बँकेत खाते उघडण्यापासून इतरही प्रक्रियांना होत असलेल्या उशीरांमुळे औषधे विकत घेण्यास वेळ लागत आहे.तुवड्यामुळे बाधितांना सात दिवसांच्या औषधीप्राप्त माहितीनुसार, मेडिकलच्या ‘एआरटी’ केंद्रावर महिन्याकाठी सुमारे आठ हजारावर एचआयव्हीबाधित औषधींसाठी येतात. महिन्याकाठी साधारण २६ हजार औषधींची गरज पडते. परंतु आठ-दहा हजार औषधींचा पुरवठा होतो परिणामी, बाधितांना जिथे महिन्याचे औषधी दिले जायचे तिथे आठवड्याचे औषधे दिले जात आहे. यामुळे अनेकांवर मेडिकलच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे.विना औषध मृत्यूचा धोकादीड-दोन महिन्यांपासून एचआयव्हीवरील औषधांचा तुटवडा पडल्याने विदर्भातील एआरटी केंद्रांवर उपचार घेणारे सुमारे पन्नास हजार एचआयव्हीबाधित प्रभावित झाले आहेत. यातच आर्थिक मागासलेपणामुळे अनेकांना केंद्रांवर औषधे घेण्यास येणे-जाणे परवडत नसल्याने औषधे घेणे बंद करण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास तुटवड्याचे कारण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.औषधांसाठी वर्षभरापासून चकरामेडिकलच्या एआरटी केंद्रावर ‘झेडएलई’ हे औषध डिसेंबर २०१८ पासून नाही. एचआयव्हीबाधितांना महिन्याला अडीच हजार रुपये खर्च करून बाहेरून ही औषधे घ्यावी लागत आहे. प्रत्येकाला मात्र हे परडवणारे नाही. यामुळे शासनाने एचआयव्ही बाधितांच्या औषधोपचाराकडे विशेष लक्ष देऊन औषधांचा तुटवडा जाणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.विपीन सिरस्करसामाजिक कार्यकर्ता

टॅग्स :HIV-AIDSएड्सmedicinesऔषधं