शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक पोलिसांच्या १०० नंबरवरून मिळाली नाही मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:39 IST

शहर पोलिसांचे हायटेक कंट्रोल रुम हे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी असते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एका गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनीला कडू अनुभव आला. त्यांनी मदतीसाठी जेव्हा १०० नंबर डायल केला तेव्हा त्यांना मदत तर मिळाली नाही, उलट समज देण्यात आली.

ठळक मुद्देमदतीऐवजी मिळाला सल्ला : गर्ल्स होस्टेलच्या विद्यार्थिनींना आला कडू अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलिसांचे हायटेक कंट्रोल रुम हे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी असते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एका गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनीला कडू अनुभव आला. त्यांनी मदतीसाठी जेव्हा १०० नंबर डायल केला तेव्हा त्यांना मदत तर मिळाली नाही, उलट समज देण्यात आली.धरमपेठ परिसरात गर्ल्स होस्टेल आहे. दिवसभर वाहनांची ये-जा असल्याने होस्टेलमधील मुली त्यांची वाहने होस्टेलजवळील फुटपाथवर पार्क करतात. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता संशयास्पद युवक होस्टेलजवळ आले. ते नशेत होते. त्यातील एका युवकाने दुचाकीचे लॉक तोडले आणि तो बाईक नेण्याचा प्रयत्न करू लागला. होस्टेलच्या मुलींच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्याला अडवले. तेव्हा तो विद्यार्थिनींसोबत धक्काबुक्की करू लागला. इतर मुली घाबरल्या. त्यांनी मदतीसाठी लगेच पोलिसांच्या आपत्कालीन १०० नंबरवर फोन केला. तेव्हा कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अर्धा तास त्यांनी प्रयत्न केला. चौकीदारही बाहेर गेला असल्याने त्यांना मदत मिळाली नाही. दरम्यान सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे यांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान बरीच आरडाओरड झाल्याने नागरिक जमा होत होते. हे पाहून आरोपी युवक पळून गेले. यानंतर सीताबर्डीचे तीन पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा एका पोलिसाने मुलींनाच समज दिली. ‘हे गर्ल्स होस्टेल आहे, अशा घटना तर होऊ शकतात, तुम्हीही समजू शकता, असा सल्ला देऊ लागला. त्यामुळे विद्यार्थिनींना मोठा धक्का बसला. चौकीदाराचीही तक्रार केली. त्यानंतर उद्या येतो असे सांगून निघून गेले. दोन दिवस झाले पोलिसांनी होस्टेलमध्ये आलेले ते युवक कोण होते, याची साधी चौकशीही केली नाही.पोलिसांच्या सामाजिक शाखेने मोबाईल अ‍ॅप सुरू केले होते. गर्ल्स होस्टेलच्या संचालक आणि त्यात राहणाऱ्या विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. तसेच त्या दूर करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. परंतु या घटनेनंतर पोलिसांचा दावा फोल ठरला आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसnagpurनागपूर