शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक! नागपूरची बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले भारतीय संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 11:33 IST

युवा प्रतिभावान बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले हिची भारतीय महिला बॅडमिंटन संघात निवड आहे.

ठळक मुद्दे उबेर चषकासाठी निवड झालेली नागपूरची पहिलीच खेळाडू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: युवा प्रतिभावान बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले हिने नागपूरच्या क्रीडाविश्वात मानाचा तुरा रोवला आहे. विश्व बॅडमिंटन महासंघाद्वारे(बीडब्ल्यूएफ) आयोजित प्रतिष्ठेच्या थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी वैष्णवीची भारतीय महिला बॅडमिंटन संघात निवड झाली. या स्पर्धेचे आयोजन बँकॉक येथे २० ते २७ मे या कालावधीत होईल.महिला एकेरीत वैष्णवी सध्या देशात दुसऱ्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या अ.भा. सिनियर रँकिंग स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे तिची राष्ट्रीय संघात निवड झाली. बालपणापासून वैष्णवीला खेळाचे धडे देणारे तिचे कोच आणि मास्टर्स गटातील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू किरण माकोडे यांनी वैष्णवीचा भारतीय संघात समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याची प्रतिक्रिया माकोडे यांनी व्यक्त केली. माकोडे म्हणाले,‘ वैष्णवीने बालपणापासून खेळ आणि व्यायाम या गोष्टी सातत्याने आत्मसात केल्या आहेत. मी तिच्यासाठी ज्या- ज्या योजना आखल्या, त्या सर्व तिने अमलात आणल्यामुळे भारतीय संघात स्थान मिळविता आले.खेळाची अपुरी साधने आणि मर्यादित सराव सुविधा असताना वैष्णवीने राष्ट्रीय संघात झेप घेतली, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. वैष्णवीच्या यशामुळे शहरातील इतर बॅडमिंटनपटूंना प्रेरणा मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास उंचावेल, अशी आशा आहे. ’ वैष्णवीसाठी यंदाचे सत्र फारच लाभदायी ठरले. आॅगस्ट महिन्यात चायनीज तायपेई येथे झालेल्या विश्व विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत तिने देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीचे विजेतेपद पटकविले होते.

भारतासाठी खेळण्याचे स्वप्न साकार- वैष्णवीविदर्भ ब्रिज संघटनेच्या शंकरनगर येथील सभागृहात नियमित सराव करणारी वैष्णवी एलएडी कॉलेजमध्ये बीए च्या दुसऱ्या वर्षाला शिकते. भारतीय संघात निवड झाल्याचे ऐकून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती म्हणाली,‘ हा माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. भारतीय संघात खेळण्याचे मी नेहमी स्वप्न पाहात होते. तो क्षण जवळ आला. सायना नेहवालच्या सोबतीने खेळण्याची संधी मिळणार आहे. मला नेहमी मार्गदर्शन करणारे कोच किरण माकोडे यांचे आभार मानते. या यशात नेहमी पाठिंबा देणाऱ्या आईवडिलांचा मोठा वाटा आहे.’

टॅग्स :Sportsक्रीडा