शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाची हिरकणी कक्ष योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:39 IST

प्रवासात आपल्या बाळाला स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबणा होते. त्यामुळे त्यांना बाळाला स्तनपान करता यावे यासाठी दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष ही योजना सुरू केली. सुरुवातीला वर्षभर हिरकणी कक्ष सुरू होता. परंतु मागील वर्षभरापासून नागपूर जिल्ह्यात ही योजनाच महामंडळाने बंद केल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे.

ठळक मुद्देमहिला प्रवाशांची गैरसोय : सार्वजनिक ठिकाणी करावे लागतेय स्तनपान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रवासात आपल्या बाळाला स्तनपान करताना महिला प्रवाशांची कुचंबणा होते. त्यामुळे त्यांना बाळाला स्तनपान करता यावे यासाठी दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष ही योजना सुरू केली. सुरुवातीला वर्षभर हिरकणी कक्ष सुरू होता. परंतु मागील वर्षभरापासून नागपूर जिल्ह्यात ही योजनाच महामंडळाने बंद केल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे.एसटी महामंडळाने प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यात हिरकणी कक्ष नावाची योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केली. यात बसस्थानकावर महिलांना आपल्या बाळाला स्तनपान करता यावे यासाठी एक कक्ष उपलब्ध करून दिला. एक टेबल आणि खुर्ची या कक्षात उपलब्ध राहायची. काही दिवस ही योजना सुरळीत चालली. परंतु त्या काळातही एसटी महामंडळाने महिलांसाठी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे, याबाबत ध्वनिक्षेपकाहून कुठलीही माहिती महिला प्रवाशांना दिली नाही. ज्या महिलांनी प्रसार माध्यमात बातमी वाचली असेल अशाच मोजक्या महिलांना या योजनेची माहिती होती. सध्या नागपूर जिल्ह्यात सर्वत्र ही योजना गुंडाळल्याची स्थिती आहे. गणेशपेठ, मोरभवन, रामटेक, सावनेर, उमरेड, काटोल आदी आगारात ही योजना बंद करण्यात आली आहे. योजना सुरू करायची त्याचा गाजावाजा करायचा आणि काही दिवसानंतर लोकोपयोगी असलेली योजना बंद करायची या एसटी महामंडळाच्या भूमिकेमुळे प्रवाशांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. प्रवासात स्तनपान करताना महिला प्रवाशांची होणारी कुचंबणा दूर करण्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष सुरू करावा, त्याबाबत महिला प्रवाशांमध्ये जागृती करावी अशी मागणी होत आहे. याबाबत विभाग नियंत्रक अशोक वरठे यांना विचारणा केली असता हिरकणी कक्ष सुरू करण्याबाबत आगार प्रमुखांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अद्याप कोणत्याही बसस्थानकावर ही योजना झाल्याचे दिसत नाही.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळWomenमहिला