शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

बांगलादेशातील हिंदूंना आपल्या पाठिंब्याची गरज; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

By योगेश पांडे | Updated: August 16, 2024 08:28 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त करण्यात आले ध्वजारोहण

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: बांगलादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बांगलादेशात असलेल्या हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, हे पाहणे एक देश म्हणून सरकारची जबाबदारी आहे, तेवढीच आपलीपण आहे. सरकार आपले काम करेलच; मात्र, त्यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबाही आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. मोहन भागवत म्हणाले की, भारताची परंपरा राहिली आहे की आपण जगाच्या उपकाराकरिता उभे राहतो. त्यामुळे आपण कधीच कोणावर आक्रमण केले नाही. जो संकटात होता त्याला मदतच केली. तो आपल्या सोबत कसा व्यवहार करतो हे बघितले नाही. जगभरातील पीडितांकरिता आपण हे करतो. सरकार हे करीत असते. शेजारील देशांमध्ये जी अस्थिरता आहे, त्यामुळे अनेकांना अराजकता झेलावी लागत आहे. त्यांना काही कष्ट सोसावे लागू नयेत, त्यांच्यावर काही अत्याचार होऊ नयेत, याची जबाबदारी एका देशाच्या नाते आपल्यावर आहेच. काही गोष्टी सरकारने आपल्या स्तरावरच कराव्यात, असे सरसंघचालक म्हणाले.

‘नवीन पिढीने स्वातंत्र्याची रक्षा करावी’

  • केवळ चिंतन करून होत नाही. स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. १८५७ नंतर ९० वर्षांचा संघर्ष चालला. अनेक प्रकारचे लोक त्यात सहभागी झाले. 
  • आपल्या देशात प्रत्येक कोपऱ्यात स्वातंत्र्य नायक झाले. अगदी सामान्य व्यक्तीदेखील स्वातंत्र्याकरिता रस्त्यावर उतरली.
  • अनेक जण जेलमध्ये गेले. अनेकांना कारावास झाला. बलिदान करणारा समूह आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहणारा समाज यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले.
  • आता येणाऱ्या पिढीला स्वतंत्रता रक्षा करायची आहे, असे डॉ. भागवत म्हणाले. 
टॅग्स :BangladeshबांगलादेशMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ