शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील रॅडिसन ब्ल्यूमध्ये सापडले हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:20 IST

वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसनमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा लावून गुन्हे शाखेच्या पथकाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या कोलकाता येथील एका तरुणीला पकडले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलाल महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी रात्री १०.४५ च्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे हॉटेलमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देगुन्हे शाखेचा छापा : कोलकाता येथील सेक्स वर्कर सापडली : महिला दलाल गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा मार्गावरील हॉटेल रॅडिसनमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा लावून गुन्हे शाखेच्या पथकाने वेश्याव्यवसाय करणाऱ्या कोलकाता येथील एका तरुणीला पकडले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या दलाल महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी रात्री १०.४५ च्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे हॉटेलमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.माया पूजाराव नावाची महिला दलाल शहरात आंतरराष्ट्रीय हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविते आणि देश-विदेशातील वारांगना ती आंबटशौकीन ग्राहकांना पुरविते, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार तिची संपूर्ण माहिती मिळवून पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी मायाला पकडण्याची योजना आखली. त्यानुसार बनावट ग्राहकाने मायासोबत सोमवारी संपर्क साधला. मायाने १० हजार रुपये एकावेळेचा दर सांगून त्याला कोलकाता येथील वारांगना उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली. ग्राहकाकडून तिने पाच हजार रुपये अ‍ॅडव्हान्स तसेच रूममध्ये जाण्यापूर्वी पाच हजार द्यावे लागेल, अशी बोलणी केली. ग्राहकाने ते मान्य करून मायाला पाच हजार रुपये दिले. मायाने ग्राहकाला रात्री १० वाजता हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये बोलवले. ठरल्याप्रमाणे ग्राहक तेथे पोहचताच त्याच्याकडून मायाने पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याला रूम नंबर २०२ मध्ये पाठविले. तेथे कोलकाताची वारांगना तयार होती. काही वेळेनंतर ग्राहकाने पोलिसांना विशिष्ट संकेत दिले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने रूम नंबर २०२ मध्ये छापा घातला. तेथे वारांगनेला ताब्यात घेण्यात आले. तत्पूर्वीच दलाल माया पोलिसांच्या ताब्यात आली होती. हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट पकडण्यात आल्याचे लक्षात आल्याने हॉटेल प्रशासन तसेच हॉलमधील पाहुण्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली. पोलिसांनी ज्या रूममध्ये वेश्याव्यवसाय चालत होता, त्या रूमची कसून तपासणी करून तेथून काही आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या.मायाचे मायाजाल देशभरकोलकाताची वारांगणा आणि दलाल माया या दोघींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना प्रतापनगर ठाण्यात नेले. तेथे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक चौकशीत हे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणा-या मायाचे मायाजाल देशभर पसरले असून, अनेक मोठ्या हॉटेलच्याही ती थेट संपर्कात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हॉटेलमध्ये ती नेहमीच ठिकठिकाणच्या सेक्स वर्कर पोहचवित असावी, असा संशय आहे. या संबंधाने गरज पडल्यास पोलीस हॉटेल प्रशासनातीलही काहींची चौकशी करू शकतात.१० दिवसांपूर्वीच आली नागपुरातया संबंधाने लोकमतशी बोलताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, पकडण्यात आलेली ही सेक्स वर्कर १० दिवसांपूर्वी मायाने नागपुरात बोलवून घेतली. तिच्याकडून धंतोलीतील एका बड्या हॉटेलमध्ये आतापर्यंत वेश्याव्यवसाय करवून घेण्यात आला. आता तिला ग्राहकाच्या मागणीनुसार, हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये पाठविण्यात आले. येथे पकडले जाण्यापूर्वी ती किती आणि कोणत्या ग्राहकांसोबत होती, त्याचीही पोलीस चौकशी करणार असल्याचे उपायुक्त कदम म्हणाले.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटhotelहॉटेल