शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मनमानी भाडे घेणाऱ्या ट्रॅव्हल्स रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 10:48 IST

ऐन सण उत्सवांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करीत आहेत. अशा तक्रारींची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आता ट्रॅव्हल बसची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देएसटीच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडे नको आरटीओ करणार कसून तपासणी

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत राज्य सरकारने खासगी ट्रॅव्हल्सने एसटीच्या तिकीट दराच्या तुलनेत दीडपटीहून अधिक भाडे आकारू नये, असे नियम ठरवून दिले आहेत. मात्र, त्यानंतरही ऐन सण उत्सवांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करीत आहेत. अशा तक्रारींची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने आता ट्रॅव्हल बसची तपासणी मोहीम हाती घेतली आहे.सुट्यांच्या हंगामात रेल्वेचे बुकिंग फुल्ल होते. त्यातच एसटीची सेवाही काहीशा अपूर्णच राहत असल्याने, प्रवाशांना खासगी बस किंवा ट्रॅव्हल्स कंपन्यांशिवाय पर्याय राहत नाही. याचा फायदा दरवर्षी घेतल्या जात असल्याचे नेहमीचे चित्र आहे. यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसचे भाडे निश्चित करण्याचा निर्णय गेल्याच वर्षी शासनाने घेतला. हे भाडेदर निश्चित करण्यासाठी पुण्याच्या केंद्रशासित सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेची नियुक्ती केली. या संस्थेने खासगी कंत्राटी वाहतुकीच्या विविध वर्गवारीतील सोयीसुविधांचा अभ्यास करून अहवाल सादर केला. यात वातानुकूलित (एसी), वातानुकूलित नसलेली (नॉन एसी), शयनयान (स्लीपर), आसनव्यस्थेसह असलेली शयनयान (सेमी स्लीपर) वाहनांची वर्गवारी केली. एसटी बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडेदर हे राज्य परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित केले जाते. हे भाडेदर विचारात घेऊन खासगी वाहनाच्या संपूर्ण बससाठी प्रति कि.मी. भाडेदर हे त्याच स्वरूपाच्या एसटी महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा (दीडपटीपेक्षा) अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय घेतला. खासगी वाहनांना प्रवाशांकडून त्याच तुलनेत तिकीट दर आकारणे बंधनकारक केले. परंतु तूर्तास चित्र वेगळे असल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.१७३३ ऐवजी २००० रुपये भाडेदिवाळीच्या निमित्ताने नागपूर-पुणे व मुंबई-नागपूर प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एसटी महामंडळाच्या दीडपट भाडे आकारण्याच्या शासनाच्या निर्णनुसार नागपूर-मुंबई या अंतरासाठी साध्या खासगी बसेसला १४३२ रुपये, ‘नॉन एसी’ बसला १७३३ रुपये, ‘एसी’ बसला २०३५ रुपये, ‘एसी व्हॉल्वो’ला ३५११ रुपये तर ‘एसी स्लीपर’ बसला १९९७ रुपये भाडे आकारण्याचा नियम आहे. परंतु काही खासगी ट्रॅव्हल्सबसेस ‘नॉन एसी’ बससाठी सुमारे १९०० ते २००० तर एसी बससाठी २५०० ते ३००० रुपयांपर्यंतचे भाडे आकारत असल्याच्या तक्रारी आहेत. याव्यतिरिक्त नागपुरातून महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक