शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित पतीपत्नीचा वाद पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 20:56 IST

घरगुती कारणावरून निर्माण झालेल्या वादात उच्चशिक्षित विवाहितेने बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक करून छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती कारणावरून निर्माण झालेल्या वादात उच्चशिक्षित विवाहितेने बजाजनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक करून छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव अपूर्वा स्वयम जोशी (वय २८) आहे. अपूर्वा आणि तिचे कुटुंबीय बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीरी कॉलनीत राहतात. अपूर्वाच्या माहेरची आणि सासरची मंडळी सधन आहेत. अपूर्वा तसेच तिचा पती स्वयम हे दोघेही उच्चशिक्षित आहे. पती डॉक्टर असून अपूर्वा फॅशन डिझाइनर म्हणून काम करते. तर २०१८ मध्ये शादी डॉट कॉम या पोर्टलवरील स्वयम जोशी यांची प्रोफाईल पाहून अपूर्वाच्या कुटुंबीयांनी हा पारिवारिक संबंध जुळवून आणला. २ सप्टेंबर २०१८ ला अपूर्वा आणि स्वयम या दोघांचे साक्षगंध झाले आणि मार्च २०१९ ला त्यांचे लग्न देखील झाले. थाटामाटात झालेल्या लग्न समारंभानंतर हे दोघेही ऑस्ट्रेलियाला गेले. तेथे दोन महिने राहिले. तेथून त्यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या. छोट्या छोट्या कारणावरून त्यांचे वाद होऊ लागले त्यानंतर ऑस्ट्रेलियाला परत जाण्यावरून हा वाद वाढत गेला. प्रकरण भरोसा सेलकडे गेले. तेथे अनेक महिने समुपदेशनाच्या नावाखाली निघाले. भरोसा सेलमध्ये मनासारखे होत नसल्याचे पाहून अखेर अपूर्वाने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.स्वयम जोशीने शादी डॉट कॉमवर फेक प्रोफाईल अपलोड करून आपली फसवणूक केली. लग्नानंतरही शारीरिक व मानसिक छळ केला, असे अपूर्वाने पोलिसांकडे नोंदविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर बुधवारी स्वयम यांच्यासह तिघांविरुद्ध फसवणूक करणे आणि शारीरिक व मानसिक त्रास देणे या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे