शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

चार महिन्यांतील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST

नागपूर : कोरोनाबाधितांसोबतच सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सोमवारी हा आकडा वाढून ६२६२वर गेला. मागील चार महिन्यांतील हा उच्चांक ...

नागपूर : कोरोनाबाधितांसोबतच सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सोमवारी हा आकडा वाढून ६२६२वर गेला. मागील चार महिन्यांतील हा उच्चांक आहे. शिवाय, सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच आज ९७५२ संशयित रुग्णांच्या चाचणीनेही नवा विक्रम गाठला. परिणामी, सोमवारी बाधितांची संख्या वाढून ७१० झाली. विशेष म्हणजे, या वर्षात मागील चार दिवसांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. २८१६ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १४३८४३ झाली असून, आठ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४२८३वर गेली.

नागपूर जिल्ह्यात या महिन्यात दुसऱ्यांदा चाचण्यांची संख्या नऊ हजारांवर गेली. यापूर्वी २० फेब्रुवारी रोजी ९४४३ चाचण्या झाल्या होत्या. दोन्हीवेळी बाधितांच्या संख्येने ७०० चा टप्पा ओलांडला. सोमवारी झालेल्या चाचण्यांमध्ये ६२४९ आरटीपीसीआर, तर ३५०३ रॅपीड अँटिजेन चाचण्यांचा समावेश होता. आरटीपीसीारमधून ६६३, तर अँटिजेनमधून ४७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एम्सच्या प्रयोगशाळेतून ५६, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ६२, मेयोच्या प्रयोगशाळेतून ९७, नीरीच्या प्रयोगशाळेतून ४०, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून १००, तर खासगी लॅबमधून ३०८ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत एकूण ११७६२०९ चाचण्या झाल्या.

-शहरात ६४१, तर ग्रामीणमध्ये ६७ नवे रुग्ण

सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ६४१, ग्रामीणमधील ६७, तर जिल्हाबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील चार, ग्रामीणमधील दोन, तर जिल्ह्याबाहेरील दोन मृत्यू आहे. शहरात रुग्णांची एकूणसंख्या ११४८६९ व मृतांची संख्या २७७१, ग्रामीणमध्ये २८०४६ व मृतांची संख्या ७६६, तर जिल्ह्याबाहेर ९२८ व मृतांची संख्या ७४६ झाली आहे. आज कोरोनाच्या प्रादुर्भावातून ४३७ रुग्ण बरे झाले आहेत.

-असे वाढले सक्रिय रुग्ण

आॅक्टोबरनंतर पहिल्यांदाच २० डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ६१३० झाली होती. त्यानंतर सोमवारी बाधितांची संख्या ६२६२वर गेली आहे. विशेष म्हणजे, ११ फेब्रुवारी- ३५४७, १२ फेब्रुवारी- ३६३४, १३ फेब्रुवारी - ३८४९, १४ फेब्रुवारी- ४०४७, १५ फेब्रुवारी- ४२६१, १६ फेब्रुवारी- ४४०५, १७ फेब्रुवारी- ५१०५, १८ फेब्रुवारी- ५६१७, २० फेब्रुवारी- ५८३४, तर २१ फेब्रुवारी- ५९९७ झाली. सक्रिय रुग्णांच्या वाढत्या संख्येने शासकीयसह खासगी रुग्णालयातील खाटाही फुल्ल होऊ लागल्या आहेत.

-दैनिक चाचण्या : ९७५२

-बाधित रुग्ण : १४३८४३

_-बरे झालेले : १३३२९८

- उपचार घेत असलेले रुग्ण : ६२६२

- मृत्यू : ४२८३