शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या मार्गातील अडथळे दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:54 IST

राष्ट्रीय दृष्टिकोन विचारात घेता लोकमत समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झालेले आहेत. मंजूर नकाशा आणि सौंदर्यीकरणाला शुक्रवारी नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देहेरिटेज समितीची मंजुरी : लोकमत समूह व मनपाचा संयुक्त उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय दृष्टिकोन विचारात घेता लोकमत समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झालेले आहेत. मंजूर नकाशा आणि सौंदर्यीकरणाला शुक्रवारी नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात नीरीचे संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य व महापालिकेचे अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, स्ट्रक्चरल अभियंता पी. एस. पाटणकर, एल.ए.डी. महाविद्यालयाच्या प्राचार्य उज्ज्वला चक्रदेव यांच्या प्रतिनिधी डॉ, नीता लांबे, नागपूर विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रपाठक डॉ. शुभा जोहरी, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, नगररचना शाखा कार्यालयाचे नगररचनाकार पी.पी. सोनारे, वास्तुविशारद अशोक मोखा आदी उपस्थित होते.कस्तूरचंद पार्क येथे देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, यासाठी मागील काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. उंच आणि २४ तास फडकणाºया राष्ट्रध्वजासंदर्भात जे नियम आहे त्या नियमांच्या अधीन राहून त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक सर्व विभागांची मंजुरी घेण्यात आली आहे. कस्तूरचंद पार्क आणि राष्ट्रध्वजासाठी असलेली जागा या दोन बाबी विभक्त होता कामा नये. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या जागेवर सुरक्षा भिंत न उभारता लोखंडी बॅरिकेटस् लावण्यात यावे, अशी सूचना हेरिटेज समितीने केली. तसेच तेथे निर्माण करण्यात येणारे थिएटर हे ग्रीन लॅण्डस्केपमध्ये असावे, अशीही सूचना समितीने केली. यासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, महापालिकेच्या स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले आणि लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग यांनी बाजू मांडली.‘झिरो माईल’ संदर्भात उपसमिती अहवाल देणार‘झिरो माईल’ स्तंभाची दुर्दशा आणि त्याचे संवर्धन यावर अभ्यास करण्यासाठी हेरिटेज संवर्धन समितीने सदस्या उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठित केली. स्ट्रक्चरल अभियंता पी. एस. पाटणकर आणि वास्तुविशारद अशोक मोखा या समितीचे सदस्य आहेत. ही समिती जागेचे प्रत्यक्ष निरीक्षण करून हेरिटेज संवर्धन समितीकडे अहवाल सादर करेल. त्यानंतर स्तंभाच्या देखभाल, दुरुस्तीसंदर्भात समिती निर्णय घेणार आहे.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजKasturchand Parkकस्तूरचंद पार्क