शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक कर्तव्य विसरणाऱ्याला हायकोर्टाचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 14:13 IST

नागपूर, दि. 24 - पत्नी व अपत्यांची योग्य देखभाल करणे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य असते. त्यामुळे या कर्तव्याची पायमल्ली करणा-या एका व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच दणका दिला. न्यायालयाने संबंधित व्यक्तीच्या पत्नी व मुलाची पोटगी कायम ठेवून त्या व्यक्तीवर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला. दावा खर्च पत्नी ...

नागपूर, दि. 24 - पत्नी व अपत्यांची योग्य देखभाल करणे प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य असते. त्यामुळे या कर्तव्याची पायमल्ली करणा-या एका व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच दणका दिला. न्यायालयाने संबंधित व्यक्तीच्या पत्नी व मुलाची पोटगी कायम ठेवून त्या व्यक्तीवर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला. दावा खर्च पत्नी व मुलाला देण्यात आला.प्रकरणातील पती नितेश (ठाणे) व पत्नी नलिनी (उमरेड) यांचे १३ डिसेंबर २००६ रोजी लग्न झाले (नावे काल्पनिक). त्यानंतर दोनच महिन्यात नलिनीचा छळ सुरू झाला. नितेश नलिनीला माणुसकीने वागवत नव्हता. गर्भवती असतानाही तिला त्रास दिला जात होता. तिला योग्य आहार दिला जात नव्हता. परिणामी तिचे पहिले बाळ पोटातच दगावले होते. दुस-यांदा गर्भवती झाल्यानंतरही तिची योग्य काळजी घेतली जात नव्हती. त्यामुळे ती माहेरी गेली व तेथे योग्य काळजी घेण्यात आल्यामुळे तिने सुदृढ बाळाला जन्म दिला. परंतु, नितेश पत्नी व मुलाला पाहण्यासाठी आला नाही. त्याने दोघांनाही वाºयावर सोडून दिले. दरम्यान, नलिनीने स्वत:ला व मुलाला पोटगी मिळण्यासाठी जेएमएफसी न्यायालयात अर्ज दाखल केला. १७ सप्टेंबर २०१० रोजी जेएमएफसी न्यायालयाने नलिनीला दोन हजार तर, मुलाला एक हजार रुपये महिना पोटगी मंजूर केली. त्याविरुद्ध नितेशने सत्र न्यायालयात अपील दाखल केले. ७ एप्रिल २०११ रोजी सत्र न्यायालयाने त्याचे अपील खारीज केले. त्या निर्णयाला नितेशने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानेही नितेशला दणका देऊन त्याची याचिका फेटाळून लावली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय