शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

नागपुरात हायटेन्शन लाईनमुळे एसएनडीएल, नासुप्र, मनपाला येणार टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:42 IST

नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका व एसएनडीएल यांना हायटेन्शन वीज लाईनमुळे टेंशन येण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील विशेष समितीने पहिला अहवाल तयार केला असून त्यात या तिन्ही संस्थांनी ३३ केव्हीच्या नारा फिडरवरील अनेक धोकादायक रहिवासी बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. हा अहवाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्देविशेष समितीचा पहिला अहवाल : अनेक धोकादायक बांधकामे लपविल्याचे निरीक्षण

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका व एसएनडीएल यांना हायटेन्शन वीज लाईनमुळे टेंशन येण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील विशेष समितीने पहिला अहवाल तयार केला असून त्यात या तिन्ही संस्थांनी ३३ केव्हीच्या नारा फिडरवरील अनेक धोकादायक रहिवासी बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. हा अहवाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष सादर केला जाणार आहे.समितीमध्ये सात तज्ज्ञांचा समावेश आहे. समितीने नारा फिडरच्या मार्गावरील बांधकामांची पाहणी केली आहे. मे-२०१८ पर्यंतच्या पाहणीचा प्रथम अहवाल तयार करण्यात आला आहे. नासुप्र, मनपा व एसएनडीएल यांनी एकत्रितपणे नारा फिडरच्या मार्गावर केवळ ७० धोकादायक रहिवासी बांधकामे असल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. समितीच्या अहवालानुसार या मार्गावर १२२ धोकादायक रहिवासी बांधकामे आहेत. नासुप्र, मनपा व एसएनडीएल यांनी अन्य धोकादायक बांधकामे का लपवली याची करणे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय समितीने अन्य विविध महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवून त्यासंदर्भात प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याची विनंती न्यायालयास केली आहे.आरमर्स बिल्डर्सने नारी येथील सुगतनगरात अवैधरीत्या बांधलेल्या एका इमारतीमध्ये प्रियांश व पीयूष धर या जुळ्या भावंडांचा हायटेन्शन लाईनमुळे गेल्यावर्षी मृत्यू झाला. न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून मध्यस्थातर्फे अ‍ॅड. शशिभूषण वाहणे कामकाज पाहत आहेत. 

समितीची निरीक्षणे

  1. नासुप्र, मनपा व एसएनडीएल यांनी हायटेन्शन वीज लाईनखालील झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष केले. हायटेन्शन वीज लाईन झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांकरिताही धोकादायक आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे.
  2.  अनेक घरमालकांनी लो-टेन्शन लाईन(४४० व्होल्टस्)पासून हातभर अंतरापर्यंत बांधकामे केली आहेत. त्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. लो-टेन्शन लाईनदेखील प्राणघातक आहे. या लाईनमुळे अनेक प्राणघातक दुर्घटना घडल्या आहेत.
  3.  वीज सुरक्षा नियमांची पायमल्ली करून करण्यात आलेली बांधकामे तातडीने तोडणे आवश्यक आहे.
  4.  दाट लोकवस्तीच्या परिसरात एअर बंच केबलची व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे वीजचोरी व वीज गळतीवर नियंत्रण मिळविता येईल. तसेच, विजेच्या धक्यामुळे होणारे मृत्यू थांबविता येतील.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीज