शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:57 IST

बजाजनगरातील एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा लावून बजाजनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

ठळक मुद्देबजाजनगरात दोन वारांगना सापडल्यादोघांना अटक, सूत्रधार फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बजाजनगरातील एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा छडा लावून बजाजनगर पोलिसांनी विक्की देवानंद खोब्रागडे (वय २४, रा. इंदिरा मातानगर, हिंगणा) आणि रूपेश गौतम ठाकूर (वय २४, रा. राजीव नगर, हिंगणा) दोन आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन तरुणींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या रॅकेटचा सूत्रधार स्वप्निल विजय गुप्ता (रा. बालाघाट) मात्र फरार झाला. बजाजनगरातील आशिष टॉवरच्या चौथ्या माळ्यावरील एका सदनिकेत आरोपी स्वप्निल विक्की आणि रुपेशच्या मदतीने कुंटणखाना चालवित होता. येथे दररोज नवनवीन तरुणी आणि व्यक्तींची गर्दी दिसत असल्याने बाजूच्यांना संशय आला. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी शहानिशा केली असता तेथे कुंटणखाना चालत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी पाठविलेल्या ग्राहकाने शनिवारी सायंकाळी स्वप्निलसोबत संपर्क साधला. त्याने ५ हजार रुपयांच्या बदल्यात तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. रक्कम हातात ठेवताच त्याने विक्की आणि रुपेशला इशारा केला. या दोघांनी ग्राहकाला दोन तरुणी दाखवल्या. त्यातील एकीला खोलीत नेल्यानंतर ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. लगेच पोलिसांनी छापा मारून विक्की आणि रुपेशसह त्या दोघींना ताब्यात घेतले. या चौघांनी सागितलेल्या माहितीवरून या कुंटणखान्याचा सूत्रधार स्वप्निल गुप्ता असल्याचे स्पष्ट झाले. प्रफुल नारायण पवार यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी स्वप्निल विक्की आणि रुपेश या तिघांविरुद्ध अनैतिक व्यापास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. स्वप्नीलचा शोध घेतला जात आहे.लकडगंजमध्येही दोघींना अटकगंगाजमुना परिसरात रस्त्यावर उभ्या राहून अंगप्रदर्शन करणाऱ्या तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना अश्लील इशारे करणाऱ्या नितू अजाबसिंग धनावत (वय २३) तसेच रेखा अजाबसिंग धनावत (वय २५) या दोघींना लकडगंज पोलिसांनी अटक केली.नितू आणि रेखा या दोघीही गंगाजमुना वस्तीतील कश्मिरीबाईच्या इमारतीत भाड्याने राहतात. गंगाजमुना परिसरात सिमेंट रोडवर उभ्या राहून त्या रस्त्याने जाणाऱ्या येणारांना अश्लील इशारे करीत असल्याचे पाहून शनिवारी रात्री ८ च्या सुमारास पोलिसांनी त्या दोघींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेट