शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 20:14 IST

गेल्या अनेक वर्षांपासून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणारी चंद्रपूरची प्रणिता विशाल जयस्वाल (वय ४३) हिला अटक करण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. देशी विदेशी वारांगनांचे मोठे सेक्स रॅकेट चालविणारी प्रणिता जयस्वाल धंतोलीतील एका हॉटेलमध्ये दोन रशियन वारांगनांकडून वेश्याव्यवसाय करवून घेताना पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी तिच्याकडून ६५ हजारांची रोकड, कार, मोबाईलसह २ लाख, ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी पत्रकारांना आज दुपारी ही माहिती दिली.

ठळक मुद्देचंद्रपूरची प्रणिता जयस्वाल पोलिसांच्या जाळ्यातदोन रशियन वारांगनाही सापडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणारी चंद्रपूरची प्रणिता विशाल जयस्वाल (वय ४३) हिला अटक करण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. देशी विदेशी वारांगनांचे मोठे सेक्स रॅकेट चालविणारी प्रणिता जयस्वाल धंतोलीतील एका हॉटेलमध्ये दोन रशियन वारांगनांकडून वेश्याव्यवसाय करवून घेताना पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी तिच्याकडून ६५ हजारांची रोकड, कार, मोबाईलसह २ लाख, ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी पत्रकारांना आज दुपारी ही माहिती दिली.चंद्रपूर येथील भुक्ते हॉस्पिटलच्या बाजूला राहणारी प्रणिता जयस्वाल नागपुरात अनेक वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवित आहे. एका रात्रीत लाखो रुपये घेऊन ती ग्राहकांना मागणीनुसार देश-विदेशातील वारांगना उपलब्ध करून देते. तिला काही पोलीस आणि पोलिसांशी निकटता असलेल्या विशिष्ट व्यक्तींचे पाठबळ असल्याने तिच्या रॅकेटला हात लावण्याची कुणी हिंमत दाखवत नव्हते. परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांना धंतोलीतील हॉटेल केपीएनमध्ये प्रणिता जयस्वालने रशियन बाला आणल्या असून, ती त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून धंतोली पोलिसांची चमू कारवाईसाठी तयार केली. ठरल्याप्रमाणे पोलिसांच्या माणसांनी ग्राहक बनून प्रणितासोबत संपर्क केला. एका वारांगनेचे एका तासासाठी पाच हजार रुपये याप्रमाणे प्रणिताने ग्राहकांना भाव सांगितला. त्यानुसार, बुधवारी रात्री ११.३० वाजता पोलिसांनी पाठविलेली चमू हॉटेल केपीएनमध्ये पोहचली. ग्राहकांकडून रक्कम घेतल्यानंतर प्रणिताने त्यांना दोन रशियन वारांगना दाखवल्या. ग्राहक त्यांच्यासोबत हॉटेलच्या रुममध्ये पोहचले. ठरल्याप्रमाणे काही वेळानंतर धंतोलीच्या पोलीस पथकाने हॉटेलमध्ये छापा घातला. यावेळी नको त्या अवस्थेत ग्राहकांसोबत महिला पोलिसांना सापडल्या.प्रणिता जयस्वाल हिने चांगल्या रोजगाराचे आमिष दाखवून दिल्लीहून आपल्याला तीन दिवसांपूर्वी नागपुरात बोलवले आणि येथे ती वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती रशियन वारांगनांनी पोलिसांना दिली. विशेष म्हणजे, या दोघींनी आपण दिल्ली येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. आधारकार्डसह अन्य कागदपत्रेही पोलिसांना दाखवली आहेत. मात्र, त्या दिल्लीच्या नव्हे तर उझबेकिस्तान, रशियाच्याच असाव्यात, असा पोलिसांचा दाट संशय आहे. दरम्यान, पोलिसांनी प्रणिता आणि तिचा कारचालक निखिल विलास शेंडे (वय २६, रा. ओमकारनगर मानेवाडा) या दोघांना पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.नागपूर, मुंबई अन् राज्याबाहेरही !प्रणिता मूळची चंद्रपूरची असली तरी ती गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरातच राहते. मनीषनगरात तिने दोन वर्षांपूर्वी एका बंगल्यातून सेक्स रॅकेट चालविणे सुरू केले होते. मात्र, सामाजिक सुरक्षा पथकातील एका पोलीस अधिकाऱ्यासोबत तिचे बिनसल्याने तिने नंतर आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने त्या अधिकाऱ्याचा काटा काढला होता. आपला अड्डाही बदलवला होता. ती सध्या हुडकेश्वरमधील पिपळा परिसरातील अथर्वनगरीत एका पॉश सदनिकेत राहते. प्रणिता आणि तिचा सहकारी आपल्याशी सख्य असलेल्या पोलिसांच्या मदतीने अन्य पोलिसांना ‘बाजीराव’ बनविण्याचा धाक दाखवत होते. कारवाईत अडकवण्याची भीती दाखवली जात असल्याने प्रणिताच्या सेक्स रॅकेटच्या आड येण्याची कुणी हिंमत दाखवत नव्हते. त्यामुळे तिने तिच्या रॅकेटचे नेटवर्क विविध राज्यात पसरवले होते. मात्र, बुधवारी प्रणिता पोलिसांच्या जाळ्यात अडकलीच.पोलीस उपायुक्त पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिताकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये वारांगनांसोबत नागपूर, मुंबईच नव्हे तर गुजरात आणि छत्तीसगडसह विविध राज्यातील अनेकांचे मोबाईल नंबर आहेत. या नेटवर्कसह मोबाईलमधील नमूद नंबरची कसून चौकशी केली जाणार असल्याचे उपायुक्त पंडित यांनी सांगितले. त्यासाठी दिल्ली पोलिसांकडेही विचारणा केली जाणार असल्याचे उपायुक्त पंडित यांनी पत्रकारांना सांगितले.डॉलर आणि दिनारही!विविध देशातील सेक्स वर्करसोबत प्रणिताचा थेट संपर्क असल्याचा पोलिसांना संशय आहे. तिच्याकडे धनिक ग्राहकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे ती कोणत्याही वेळी, कुठलीही वारांगना उपलब्ध करून देऊ शकते. ती बाहेरून ज्याप्रमाणे वारांगना बोलवते त्याचप्रमाणे नागपूर आणि विदर्भातील वारांगना बाहेर ठिकाणी पोहचवत असल्याचाही संशय आहे. पोलिसांनी तिच्याकडून रोख रक्कम, दोन कार, आयफोनसह रोख रक्कम आणि डॉलर तसेच दिनारही जप्त केले. त्यावरून ती विदेशी ग्राहकांच्याही संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करणार आहेत. ज्या हॉटेलमध्ये वारांगनांसह प्रणिताला पोलिसांनी पकडले त्या हॉटेल प्रशासनाचीही चौकशी केली जात आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाट सेक्स रॅकेट चालविणाऱ्या प्रणिता जयस्वालला रंगेहात पकडण्याची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे, पीएसआय सरिता यादव, पीएसआय वडतकर, पीएसआय सचिन मत्ते, एएसआय शेंडे, नायक रेमण्ड, संतोष, अजय, हितेश, योगेश, ज्योती, राजेश आणि दिनेश यांनी ही कामगिरी बजावली. 

 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाnagpurनागपूर