लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मसाज पार्लरच्या आड चालणाऱ्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सदर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा मारून दोघांना अटक केली. प्रफुल्ल प्रकाश येवतकर (वय २४, रा. देवनगर खामला) आणि क्लाऊ अॅडवर्ड अॅन्थोनी (वय ४५, रा. सुगतनगर, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत.या दोघांनी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम टॉवरच्या तिसऱ्या माळ्यावर लेझर मसाज पार्लर सुरू केले. येथून मसाज पार्लरच्या आड ते हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवित होते. सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांना ही माहिती कळताच त्यांनी तेथे गुरुवारी आपल्या सहकाऱ्यांकडून छापा घातला. यावेळी तेथे एक तरुणी वेश्याव्यवसाय करताना सापडली. पैशाचे आमिष दाखवून आरोपी वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचेही तिने सांगितले. त्यावरून सदर पोलीस ठाण्यात येवतकर आणि अॅन्थोनीविरुद्ध पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तरुणीची चौकशी करून तिला सोडून देण्यात आले.
नागपुरात मसाज पार्लरच्या आड हायप्रोफाईल कुंटणखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:14 IST
मसाज पार्लरच्या आड चालणाऱ्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सदर पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा मारून दोघांना अटक केली. प्रफुल्ल प्रकाश येवतकर (वय २४, रा. देवनगर खामला) आणि क्लाऊ अॅडवर्ड अॅन्थोनी (वय ४५, रा. सुगतनगर, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत.
नागपुरात मसाज पार्लरच्या आड हायप्रोफाईल कुंटणखाना
ठळक मुद्देसदर पोलिसांचा छापा : दोघांना अटक, तरुणीला सोडले