शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्येचा उच्चांक : विदर्भात११५ रुग्णांची नोंद, दोन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 21:59 IST

विदर्भात गेल्या दोन दिवसापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना, बुधवारी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ११५ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या २४६९ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या २४६९ : मृतांची संख्या ८३

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात गेल्या दोन दिवसापासून रुग्णांची संख्या मंदावली असताना, बुधवारी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ११५ रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले. रुग्णांची एकूण संख्या २४६९ वर पोहचली आहे. अकोल्यात आज पुन्हा दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांची एकूण संख्या ८३ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात मंगळवारी ४२ रुग्णांची नोंद झाली असताना, आज त्याच्या दुप्पट ८५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील ६१ वर रुग्ण हे एकट्या नाईक तलाव व बांगलादेश वसाहतीतील आहेत. ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ८६२ वर पोहचली आहे. यात १५ मृत्यू तर ५२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अकोला जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मृत्यूची नोंद झाली. आज दोन मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ४२ झाली, शिवाय २० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ८८४ झाली. यातील ५७७ रुग्ण बरे झाले. यवतमाळ जिल्ह्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या १६२ झाली असून, १२६ रुग्ण बरे झाले आहेत. येथे मृत्यूची संख्या तीन आहे. अमरावती जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली. रुग्णाची संख्या २८७ तर २०२ रुग्ण बरे झाले आहेत. अकोल्यानंतर सर्वाधिक मृत्यू या जिल्ह्यात आहेत. येथे मृत्यूची संख्या १७ आहे. बुलडाण्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ९६ झाली आहे. बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ६६ आहे. या जिल्ह्यात तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तीन रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या ४२ वर पोहचली आहे. यातील २३ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद नाही. वर्धा, भंडारा, गोंदिया, वाशिम व गडचिरोली जिल्ह्यात आज रुग्णाची नोंद झाली नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याVidarbhaविदर्भ