शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

उच्चशिक्षित पत्नीला मारहाण

By admin | Updated: May 12, 2016 03:07 IST

सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या उच्चशिक्षित पत्नीकडून घटस्फोट मिळावा म्हणून तिला भर रस्त्यात बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध...

हुडकेश्वरमधील घटना : पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा नागपूर : सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या उच्चशिक्षित पत्नीकडून घटस्फोट मिळावा म्हणून तिला भर रस्त्यात बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. देवेंद्र मधुकर शेंडे असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव असून, त्याला मदत करणारा त्याचा भाऊ मारुती शेंडे तसेच वहिनी कल्पना शेंडेविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रीती देवेंद्र शेंडे (वय २७) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. सधन कुटुंबातील सदस्य असलेली प्रीती सध्या पीएच.डी. करीत आहे. घरच्यांचा विरोध झुगारून २०१० मध्ये तिने देवेंद्रसोबत प्रेमविवाह केला. नंतर माहेरच्यांनी नमते घेत प्रीती-देवेंद्रचे थाटात लग्न लावून दिले. महागड्या भेटवस्तूही दिल्या. दोन वर्षांपर्यंत सर्व सुरळीत होते. नंतर प्रीती आणि देवेंद्रमध्ये वाद सुरू झाला. तो टोकाला पोहचला. त्यामुळे २०१४ मध्ये दोघेही विभक्त झाले. प्रीती अयोध्यानगरातील वडिलांच्या घरी राहू लागली. देवेंद्र मौदा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्यांच्यात घटस्फोटाची केस सुरू आहे. लवकर सोडचिठ्ठी मिळावी म्हणून देवेंद्र तिच्यासोबत तिच्या वडिलांवरही दबाव टाकत आहे. मध्यस्थी करणारांनाही तो कमी जास्त बोलतो. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी ३ वाजता किरणापुरातील आपल्या वडिलांच्या मित्राच्या घरी गेली. तेथे देवेंद्र, त्याचा भाऊ अन् वहिनीही पोहचले. त्यांच्यात तेथे कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर प्रीतीच्या तक्रारीनुसार, देवेंद्रने प्रीतीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.जबर जखमी झालेल्या प्रीतीने हुडकेश्वर ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे प्रीतीने सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर यांना मदत मागितली. नूतन रेवतकर यांनी पोलिसांकडे हे प्रकरण रेटून धरल्यानंतर देवेंद्र, त्याचे भाऊ आणि वहिनीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.(प्रतिनिधी)उमरेडमध्येही मारहाणभर रस्त्यावर पत्नीला बेदम मारहाण करण्याची देवेंद्रची ही दुसरी वेळ आहे. त्याने यापूर्वी उमरेड येथे कार्यरत असताना तेथेही प्रीतीला अशीच मारहाण केली होती. एवढेच नव्हे तर लग्नात मिळालेल्या भेटवस्तू हडपून तेथून प्रीतीला हाकलून लावले होते. आपण पोलीसमध्ये कार्यरत असल्याने आपले काहीच बिघडू शकत नाही, असा देवेंद्रचा गैरसमज होता. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर तो कोणती भूमिका घेतो, त्याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.