शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : वर्धा-पुलगाव रोडचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 20:59 IST

वर्धा ते सिंदखेड राजा हा महामार्ग ठिकठिकाणी खराब झाला असून, त्याच्या दुरुस्तीचा कार्यक्रम बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला.

ठळक मुद्देमहामार्ग दुरुस्तीचा कार्यक्रम सादर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वर्धा ते सिंदखेड राजा हा महामार्ग ठिकठिकाणी खराब झाला असून, त्याच्या दुरुस्तीचा कार्यक्रम बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील वर्धा-पुलगाव रोडचे काम १८ डिसेंबर २०१९ पर्यंत व चिखली-जालना रोडचे काम जून-२०२० पर्यंत तर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारक्षेत्रातील पुलगाव ते जालना या २८५ किलोमीटर रोडच्या दुरुस्तीचे काम ऑगस्ट-२०२० पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.यासंदर्भात अ‍ॅड. अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने वरील तारखा पुढील कार्यवाहीसाठी रेकॉर्डवर घेतल्या. चिखली-जालनामधील ११ किलोमीटर रोड वनक्षेत्रातून जातो. या ठिकाणी काम करण्यासाठी वन विभागाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे न्यायालयाने वन विभागाला एक महिन्यात आवश्यक परवानग्या देण्याचे निर्देश दिले. महामार्ग प्राधिकरणच्या म्हणण्यानुसार, पुलगाव ते जालना रोडच्या दुरुस्ती कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ११० दिवसांचा वेळ लागणार आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने या काळात रोडची देखभाल कोण करेल, असा सवाल प्राधिकरणला विचारला व यावर उद्या (गुरुवारी) उत्तर सादर करण्यास सांगितले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. अनीश कठाणे यांनी कामकाज पाहिले.अहवालावर मागितले उत्तरन्यायालयाने अमरावती-मलकापूर महामार्गाच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. त्या समितीने अहवाल सादर केला आहे. त्या अहवालातील शिफारशींवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीविषयी उद्या (गुरुवारी) प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश न्यायालयाने महामार्ग प्राधिकरणला दिला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhighwayमहामार्ग