शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : कस्तुरचंद पार्क मैदान पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 21:39 IST

शहराच्या हृदयस्थळी असलेले हेरिटेज कस्तुरचंद पार्क मैदान खड्डे बुजवून व इतर कामे पूर्ण करून दोन आठवड्यात पूर्ववत करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका, मेट्रो रेल्वे व इतरांना दिला.

ठळक मुद्देमनपासह इतरांना आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेले हेरिटेज कस्तुरचंद पार्क मैदान खड्डे बुजवून व इतर कामे पूर्ण करून दोन आठवड्यात पूर्ववत करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका, मेट्रो रेल्वे व इतरांना दिला.यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कस्तुरचंद पार्क मैदानावर सध्या विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदान ठिकठिकाणी खोदण्यात आले आहे. जागोजागी झुडपे वाढली आहेत. काही दिवसांपूर्वी मैदानावरील स्मारकामध्ये अतिक्रमणही करण्यात आले होते. न्यायालयाने फटकारल्यानंतर मनपा व पोलिसांनी तातडीने हालचाली करून अतिक्रमण हटवले. परंतु, मैदानावरील खड्डे व झुडपे कायम आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने वरील आदेश दिला व पुढच्या तारखेपर्यंत मैदान पूर्ववत झाल्याचे पुरावे सादर करण्यास सांगितले. अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे तर, अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयKasturchand Parkकस्तूरचंद पार्क