शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मजुरांच्या फरफटीची हायकोर्टाने घेतली गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:06 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी याची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, सरकारी वकील अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांना यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती घेण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देजनहित याचिका दाखलसरकारी वकिलांना माहिती घेण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रोजगाराच्या शोधात शेजारी राज्यांतून आणि विविध जिल्ह्यांमधून नागपुरात आलेल्या मजुरांसह इतर नागरिक लॉकडाऊनने उपासमारीची वेळ आणल्यामुळे पायी किंवा मिळेल त्या साधनाने घरी परतत आहेत. त्यात गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध आदींचा समावेश आहे. या प्रवासात त्यांची अमानुष फरफट होत आहे. मानवाधिकार पायदळी तुडवला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी शुक्रवारी याची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, सरकारी वकील अ‍ॅड. सुमंत देवपुजारी यांना यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती घेण्याचे निर्देश दिले.या प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याविषयी नियमानुसार याचिका तयार करून ती १२ मेपर्यंत न्यायालयात सादर करण्यात यावी, असे अ‍ॅड. चव्हाण यांना सांगण्यात आले आहे. शेजारी राज्ये आणि विविध जिल्ह्यांतील हजारो नागरिक नागपुरात येऊन घरकाम, बांधकाम, वाहनचालक, माळीकाम, रोजमजुरी, किरकोळ वस्तूंची विक्री इत्यादी माध्यमांतून अर्थार्जन करीत होते. त्यातून त्यांच्या कुटुंबाचे पालन-पोषण, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार इत्यादींवरचा खर्च भागत होता. परंतु, कोरोना नियंत्रणासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार हिरावला गेला. अर्थार्जन बंद झाले. परिणामी, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. इतर खर्च भागवणे अशक्य झाले. सरकारने त्यांना घरी पोहचवून देण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलली नाहीत. प्रभावी योजना तयार केली नाही. त्यातून परिस्थिती अधिक बिघडली. स्थलांतरित नागरिकांचा संयम सुटला. त्यातून हजारो नागरिक पायी वा मिळेल त्या साधनाने आपापल्या घरी पोहचण्यासाठी निघाले आहेत. परंतु, प्रशासन सहकार्य करण्याचे सोडून त्यांची ठिकठिकाणी अडवणूक करीत आहे. नागपूरबाहेर या नागरिकांना अडवून ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांचे खाण्यापिण्यावाचून हाल होत आहेत. याशिवाय त्यांचा जीवाचे हाल करणारा प्रवास माणुसकीची भावना दुखावणारा आहे. उच्च न्यायालयाने याची दखल घेतल्यामुळे प्रशासनाला डोळे उघडावे लागणार आहेत.

 

टॅग्स :Courtन्यायालय