शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : यवतमाळ जिल्हा परिषद सभापतींविरुद्ध पारित अविश्वास ठरावाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 22:35 IST

यवतमाळ जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती निमिष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्याविरुद्ध पारित अविश्वास ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. तसेच, राज्य सरकार, जिल्हा परिषद व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या दोघांच्या याचिकेवर १२ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देराज्य सरकार व इतर प्रतिवादींना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यवतमाळ जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती निमिष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्याविरुद्ध पारित अविश्वास ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. तसेच, राज्य सरकार, जिल्हा परिषद व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या दोघांच्या याचिकेवर १२ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर अवकाशकालीन न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मानकर व दरणे यांनी अविश्वास ठरावाविरुद्ध रिट याचिका दाखल केली आहे. ठराव अवैध असल्याने तो रद्द करण्यात यावा, असे त्यांचे म्हणणे आहे. मानकर यांच्याविरुद्ध ५९ मतांनी तर, दरणे यांच्याविरुद्ध ४८ मतांनी अविश्वास ठराव पारित झाला होता. ६१ सदस्यीय यवतमाळ जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० सदस्य शिवसेनेचे आहेत. सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन वर्षापूर्वी काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. अध्यक्षपद काँग्रेसकडे तर, उपाध्यक्षपद भाजपाकडे आहे. दरम्यान, भाजपा व सेनेने देश व राज्यासह जिल्ह्यातही एकजुटीने राहण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच मानकर व दरणे यांच्यासह महिला व बाल कल्याण सभापती अरुणा खंडाळकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. खंडाळकर यांच्याविरुद्धचा ठराव बारगळला. न्यायालयात याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. चिन्मय धर्माधिकारी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयYavatmalयवतमाळ